Episodes
अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक डोनाल्ड ट्रम्प यांनी जिंकली. ते कसे जिंकले, आता ते काय करतील, भारताला त्याचा फायदा आहे का, अमेरिकेतील भारतीय त्याकडे कसे बघतात अशा अनेक प्रश्नांची उकल करण्यासाठी अमेरिकेतील प्रसिद्ध युट्यूबर अमेरिकन भाऊ अर्थात राहुल पाटील यांना बोलतं केलं आहे, संतोष देशपांडे आणि योगेश दशरथ यांनी. मित्रांमधल्या सहज गप्पांमधून अमेरिकेच्या भविष्याविषयी होणारं हे भाष्य फार गंभीरपणे घेऊ नये..मात्र त्याची नोंद जरुर ठेवावी अशा अनेक गोष्टी इथे उलगडतील. 
Published 11/16/24
कोणतंही गाणं आपल्यापर्यंत पोहोचतं, त्यामागे त्या गायकासह अनेकांचे प्रचंड कष्ट असतात. एरव्ही गाणं म्हणणं आणि ते स्टुडिओत रेकॉर्ड करणं यात मोठा फरक आहे. कला, शास्त्र, तंत्र आणि प्रतिभा या सर्व गुणांचा मिलाफ स्टुडिओत पाहायला मिळतो. याच विषयावर प्रसिद्ध गायक अवधूत गांधी आणि डॉन स्टुडिओत रेकॉर्डिंग विभागाची धुरा वाहणारे प्रसिद्ध साउंड इंजिनिअर तुषार पंडीत यांच्याशी संतोष देशपांडे यांनी संवाद साधला. यातून गायक आणि रेकॉर्डर यांच्यातील एक आगळं नातं पुढं आलं. आपापल्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणारे...
Published 11/09/24
महाराष्ट्रातील यंदाची विधानसभेची निवडणूक अनेक अर्थांनी अभूतपूर्व अशी आहे. विविध राजकीय पक्षांमध्ये सत्तेत येण्यासाठी तुंबळ लढाई सुरु झालेली आहे. दुसरीकडे सामान्य मतदारही कमालीचा अस्थिर झाल्याचे चित्र आहे. या साऱ्या चित्राकडे पाहता सध्याचे राजकारण कोठे जाते आहे, कोणाचे काय चुकते आहे, कोणत्या पक्षाची काय बलस्थाने आणि उणीवा आहेत आणि मतदारांनी नेमके काय करायला हवे याविषयी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, सल्लागार राजेंद्र हुंजे यांनी आपली परखड मते मांडली आहेत, संतोष देशपांडे यांसमवेत रंगलेल्या या दिवाळी...
Published 11/01/24
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कुठं फिरायला जावं असा एक प्रश्न अनेकांना पडतो. म्हणूनच, या प्रश्नाची उलगड करण्यासाठी संतोष देशपांडे यांनी बोलतं केलं आहे, पर्यटन सल्लागार व स्मिता हॉलिडेज् या नामांकित संस्थेच्या संचालक प्रज्ञा गोरे यांना. सध्या कोणती पर्यटनस्थळे ट्रेंडिंग आहेत, या सिझनमध्ये कुठे कुठे जाता येऊ शकते इथपासून ते सर्वांपेक्षा वेगळी अशी ऑफबिट डेस्टिनेशन्स कोणती आहेत, याची छानशी उकल प्रज्ञाने यामध्ये केलेली आहे. फिरायला जावेसे वाटणाऱ्यांनी आवर्जून ऐकावा, असा हा पॉडकास्ट. 
Published 10/26/24
दिवाळी जवळ आली की आपल्याकडे दिवाळी अंकांचे आगमन सुरु होते. यंदा `मास्टर की` नावाचा दिवाळी अंक प्रथमच वाचकांच्या भेटीस येत आहे. हा रहस्यकथा विशेषांक आहे. त्याचे स्वागत करतानाच, एकूणच दिवाळी अंकांचं रहस्यकथांशी असणारं नातं, या दिवाळी अंकातील रहस्यकथांचे वेगळेपण तसेच त्यातील संपादनाचा अनुभव या विषयावर संतोष देशपांडे यांनी बोलतं केलं आहे `मास्टर की` ची संपादकीय धुरा ज्यांनी सांभाळली ते संपादक सम्राट शिरवळ यांना. दिवाळी अंकांच्या दुनियेतील हा वेगळा प्रयोग रसिकांपुढे येताना त्यानिमित्त रंगलेला हा...
Published 10/19/24
जगभरात मोठे अस्थिर वातावरण आहे. इस्त्रायल -इराण यांच्यातील थेट युद्ध ते अमेरिका, चीन, रशिया यांच्यातील सुप्त संघर्ष आणि त्यातून वेगाने पाहणारे जागतिक चित्र, यांचा आढावा घेतानाच असा स्थितीत, भारतात आयटी किंवा संगणक क्षेत्रात अभियंते होऊन उत्तम करिअर करु पाहणाऱ्यांपुढे काय आव्हाने असणार आहेत, याचा नेमका वेध स्टोरीटेल इंडियाचे प्रमुख योगेश दशरथ आणि संतोष देशपांडे यांच्या गप्पांमधून घेतला गेला आहे. आयटी क्षेत्रात करिअर करु पाहणाऱ्या प्रत्येकाने अन् त्याच्या पालकांनी ऐकालयाच हवा असा हा पॉडकास्ट. 
Published 10/03/24
गणेशोत्सव सोहळ्यात खरे रंग भरतात ते ढोल ताशा पथकांकडून केले जाणारे जल्लोषमय वादन. पुण्यातून सुरु झालेली ही ढोल-ताशा संस्कृती आता जगभरात विस्तारली आहे. मात्र, ढोलताशा पथकांत काम करणाऱ्यांचे जग नक्की काय असते, ते कोणत्या भावनेतून वादन करतात, त्यातून त्यांना काय मिळते, ढोलताशांचे अर्थकारण काय असते, अशा पथकांपुढची आव्हाने काय असतात या व अशा अनेक प्रश्नांची उलगड पुण्यातील अग्नी या ढोलताशा पथकाचे प्रमुख मंदार गोसावी यांनी संतोष देशपांडे यांच्याशी बोलताना केली आहे. हा पॉडकास्ट एकूणच ढोलाताशांविषयी...
Published 10/02/24
स्वीडन...युरोपातील उत्तरेकडील एक प्रगत आणि सुंदर राष्ट्र अशी ओळख असणाऱ्या या देशात तेथील महाराष्ट्रीय किंवा मराठी समाजाने आपली सांस्कृतिक ओळख, परंपरा जतन करण्यासाठी कायमच पुढाकार घेतला आहे. स्वीडनची राजधानी असलेल्या स्टॉकहोम येथील महाराष्ट्र मंडळ हे तेथील तमाम मराठीजनांचे प्रतिनिधित्व करते. या संघटनेच्या माध्यमातून स्टॉकहोमला मराठी भाषा, संस्कृती, परंपरा जपण्याच्या दृष्टीने अनेक उपक्रम चालविले जातात. गणेशोत्सव हा त्यांच्यासाठी एक मोठा उत्सव असतो. गणरायांच्या आगमनाच्या निमित्ताने, स्टॉकहोम...
Published 09/07/24
घटनेने दिलेल्या आरक्षणात वर्गवारी व्हायला हवी का, असा एक महत्त्वाचा विषय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे चव्हाट्यावर आला आहे. घटनेने दिलेल्या आरक्षणात क्रिमिलेअरसारखे निकष लावून वंचितांतील वंचितांना पुढे यायची संधी मिळावी, असे अनेकांना वाटते, तर मूळात अशा प्रकारे भेद करता येणार नाही, असे दुसऱ्या बाजूचे म्हणणे आहे. या संवेदनशील विषयावर, ज्येष्ठ साहित्यिक, संशोधक व जातीव्यवस्थेचे अभ्यासक संजय सोनवणी यांनी आरक्षणात वर्गवारी असायला हवी, अशी भूमिका घेतली आहे. संतोष देशपांडे यांसमवेतच्या...
Published 08/31/24
आगामी काळात जगभरात नोकऱ्यांवर गदा येणार असल्याचे भाकित केले जात आहे. या पार्श्वभूमीवर, नोकरी ही संकल्पना कशी बदलते आहे, का बदलते आहे तसेच वेगळ्या भाषा शिकल्याने करिअरचा आलेख उंचावता येणे कसे शक्य आहे, याविषय विश्लेषण केले आहे स्टोरीटेल इंडियाचे प्रमुख योगेश दशरथ यांनी संतोष देशपांडे यांसमवेतच्या या गप्पांमधून. जरुर ऐका आणि भविष्याचा कानोसा आताच घ्या. 
Published 08/25/24
उद्यमी तरुणाई हे भारताचे भूषण. ज्या तरुण उद्योजकांनी आपल्या पूर्वीच्या पिढीपासून आलेला उद्योगाचा वारसा पुढे नेताना आपला स्वतःचा ठसा उमटविला आणि आपल्या उद्योगाला नवी दिशा दिली, अशा नेक्स्टजेन उद्योजकांच्या यशाची गाथा म्हणजेच मूव्हिंग ॲस्पिरेशन्स. प्रेरक लेखक दत्ता जोशी यांच्या संकल्पनेतून आणि शब्दांतून आपल्यापुढे आलेली ही नवकर्तृत्वाची शोधयात्रा दोन भागांमधून मुद्रित तसेच पॉडकास्ट माध्यमातून श्राव्यरुपात वाचक-श्रोत्यांपुढे आली आहे. यानिमित्ताने, संतोष देशपांडे यांसमवेत रंगलेल्या गप्पांमधून या...
Published 08/17/24
आगामी अ.भा. मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये आयोजित करण्याचे निश्चित झाले. मात्र, त्यावर महाराष्ट्रातील अनेकांनी, विशेषतः ग्रंथविक्रेत्यांनी नापसंती व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर, दिल्लीमध्ये मराठी साहित्य आयोजित करणे का ऐतिहासिक आहे, त्यातून नेमके काय साध्य होणार आहे याविषयी परखड भाष्य केले आहे ज्येष्ठ साहित्यिक व अभ्यासक संजय सोनवणी यांनी. संतोष देशपांडे यांसमवेत रंगलेल्या कट्ट्यावरील गप्पांमध्ये सोनवणी यांनी मराठी लोकांच्या दिल्लीकडे पाहण्याच्या मानसिकतेवरही भाष्य केले आहे.  
Published 08/10/24
किशोरकुमार असं नुसतं म्हटलं तरी त्याची असंख्य गाणी मनात गुंजू लागतात. मन प्रसन्न करुन जातात. कैक पिढ्यांचं भावजीवन त्यांच्या जादुई आवाजावर पोसलं गेलं आहे. अशा या किशोरदांना गुरुस्थानी मानून गेली २५ वर्षे अविरत गायन करणारे आणि `व्हाइस ऑफ किशोरकुमार` अशी कीर्ती लाभलेले प्रसिद्ध गायक जितेंद्र भुरुक यांचे `किशोरमय` विश्व देखील अद्भूत आहे. हे विश्व जाणून घेण्यासाठी, त्यांच्या नजरेतील किशोरदा जाणून घेण्यासाठी संतोष देशपांडे यांनी त्यांना बोलतं केलं आणि स्टोरीटेल कट्ट्यावर रंगली किशोरदांवरची...
Published 08/03/24
सध्या जगभरात अनेक पातळ्यांवर उलाथापालथ सुरु आहे. क्रीडा क्षेत्रात टी२० वर्ल्डकप, विम्बल्डन, युरो, कोपा अमेरिका अशा स्पर्धांनी मागचा आठवडा गाजवला. तोवर मुद्दा पेटला तो अमेरिकेत माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रॅम्प यांच्यावर झालेल्या गोळीबाराचा. त्यानिमित्ताने, अमेरिकेत हे गन-कल्चर कसे आहे, त्याची मूळं कुठे आहेत याचा वेध घेतला स्टोरीटेल इंडियाचे प्रमुख योगेश देशपांडे आणि संतोष देशपांडे यांनी या पॉडकास्टमधून. ग्लोबल विषयांचा हा धावता आढावा घेताना इथे योगेशने दिल्या आहेत स्टोरीटेलवरील काही इंटरेस्टिंग...
Published 07/20/24
पंढरपूरला विठुरायाच्या ओढीने अवघ्या महाराष्ट्रातून वारकरी धाव घेतात. या वारीमध्ये असं नेमकं काय असतं, जे त्यांना एका सूत्रात बांधतं? अलीकडच्या काळात वारीला इव्हेंट म्हणून पाहणारा वर्ग उदयास येताना दिसतो. त्याचवेळी राज्यातील सामाजिक वातावरणही जाती-जातींमधील अविश्वासातून बिघडू पाहते आहे. या पार्श्वभूमीवर, वारी म्हणजे नेमके काय, ती काय साध्य करते, काय संदेश देते यावर संत साहित्याचे अभ्यासक, पत्रकार डॉ. श्रीरंग गायकवाड यांनी परखड भाष्य केले आहे. संतोष देशपांडे यांसमवेत त्यांनी साधलेल्या या...
Published 07/06/24
आर्थिक गुन्हेगारी उघडकीस आणणारे फॉरेन्सिक अकाउंटिंग म्हणजे नेमके काय, त्यात काय केले जाते, देशातील अनेक आर्थिक घोटाळे उघडकीस आणण्यात या तज्ज्ञांचे योगदान किती मोठे आहे या गोष्टी सर्वसामान्य लोकांसाठी नवीन आहेत. पुण्यातील फॉरेन्सिक ऑडिटर अपूर्वा जोशी यांनी याच विषयावर लिहिलेले आर्थिक गुन्हेगारीचे अंतरंग हे पुस्तक राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केले. ते सध्या अत्यंत गाजते आहे. या पार्श्वभूमीवर, खुद्द लेखिका अपूर्वा जोशी यांच्याशी संतोष देशपांडे यांनी संवाद साधला आणि त्यातून अनेक अज्ञात पैलू उलगडत...
Published 06/30/24
पर्यटन हे फक्त मनास विरंगुळा म्हणून असतं का? नाही! पर्यटनातून त्याहून वेगळं काही साध्य होत असतं. त्यातून आपला दृष्टिकोन विकसित होतो. युरोपमध्ये काही दिवसांपूर्वी भ्रमंती केल्यानंतर ज्येष्ठ संपादक यमाजी मालकर आणि संतोष देशपांडे यांना काही वेगळं गवसलं... त्याची, त्यांच्याच गप्पांमधून उलगड करणारा हा अत्यंत वेगळा पॉडकास्ट. प्रत्येकानं जरुर ऐकावा अन् वेगळ्या दुनियेतील डोळस मुशाफिरी करावी. 
Published 06/16/24
आपल्या अजरामर कलाकृतींमधून कैक दशके कोट्यवधी प्रेक्षकांच्या मनाला भुरळ पाडणाऱ्या चित्रपटांचे दिग्दर्शक म्हणजेच `डायरेक्टर्स` आता नव्याने आपल्या भेटीस आले आहेत. होय, प्रसिद्ध लेखिका दीपा देशमुख यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या `डायरेक्टर्स` या पुस्तकातून निवडक भारतीय दिग्दशर्कांच्या कलाप्रवासाचा ओघवता आस्वाद रसिकांपर्यंत पोहोचला आहे. या ग्रंथनिर्मितीमागची पटकथा काय होती, हे दीपा देशमुख यांसमवेतच्या या संवादातून संतोष देशपांडे यांनी या विशेष पॉडकास्टमधून आपणापुढे आणली आहे. कोणत्या...
Published 06/11/24
मनोरंजन क्षेत्र विशेषत: चित्रपट निर्मिती अर्थात 'फिल्ममेकिंग' अनेकांना करिअर साठी साद घालते. प्रत्यक्षात हे क्षेत्र कसे आहे,  त्यात करियर कसे होते? त्यासाठी शिक्षणाच्या संधी कोणत्या आहेत,  या विषयावर प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक,  लेखक व माध्यमकर्मी प्रसाद नामजोशी यांच्याशी संतोष देशपांडे यांनी साधलेला हा संवाद तुम्हाला नेमकी दिशा देऊन जातो!
Published 06/03/24
मुलांचे पुस्तकांशी नाते जडले तर त्यातून त्यांचे व्यक्तिमत्त्व फुलते, मनात प्रेरणा पेरल्या जातात. याकामी शालेय ग्रंथालये मोठी भूमिका बजावू शकतात. प्रत्यक्षात, आज शाळेतील ग्रंथालयांची स्थिती कशी आहे, यावर संशोधन करुन पीएचडी मिळविलेल्या सीमा तारे यांनी अनेक महत्त्वाची निरीक्षणे नोंदविली आहेत. त्याचाच वेध घेणारा कट्ट्यावर रंगलेला हा संवाद प्रत्येक शिक्षक, पालक आणि पुस्तकप्रेमी घटकाने ऐकायलाच हवा!
Published 05/26/24
निर्मितीची प्रक्रिया ही एका अर्थाने अतिशय सहज, सोपी असते तर दुसऱ्या अर्थाने अत्यंत कठीण. विशेषतः कलाक्षेत्रात.. जिथे तुमच्या भावभावनाही तुमच्या प्रतिभेच्या कर्तृत्वाच्या साक्षी असतात.... मिलिंद जोशी यांनी अशा कलाक्षेत्रात आपल्यातील सृजनशीलतेला एका आशयघन जगण्याचे जणू एक माध्यमच बनवले... नेमके कसे... ऐका त्यांच्यांच शब्दांत. शब्द, सूर, स्वर आणि भावनांच्या एकात्मेचे क्षितिज शोधू पाहणाऱ्या या कलाकाराच्या ` सृजनाच्या वाटेवर`च्या गप्पांचा हा उत्तरार्ध. केवळ ऐकू नका तर मनातही साठवा. कदाचित, तुमचीच...
Published 05/18/24
सर्जनशीलतेची अनिवार ओढ मनात असेल तर आपला `आरसा` होतो म्हणजे नेमकं काय घडतं?शब्द, स्वर, संगीत आणि अमूर्त चित्रांच्या आगळ्या विश्वात रममाण होत आगळं जगणं जगणारे प्रतिभावंत कलाकार मिलिंद जोशी यांनी आपल्या सृजनरंगात रंगण्याचा प्रवास खास कट्ट्याच्या श्रोत्यांपुढे उलगडून दाखविला आहे. प्रत्येकाच्या मनात दडलेल्या संवेदनशील कलाकाराची, त्याच्या भावविश्वाची हळूवार उलगड मिलिंद जोशी यांच्या समवेत संतोष देशपांडे यांनी मारलेल्या या गप्पांमधून होतो. अशा या सृजनाच्या वाटेवरच्या गप्पांचा हा पूर्वार्ध तुम्हाला...
Published 05/11/24
दहावी-बारावीनंतर आता खरे वेध लागले आहेत ते पुढच्या करिअरसाठी अभ्यासक्रम निवडण्याचे. खरं तर करिअर मार्गदर्शन हे वेळेवर आणि अचूक होणं अत्यंत आवश्यक असतं. म्हणूनच खास कट्ट्याच्या श्रोत्यांसाठी संतोष देशपांडे यांनी बोलतं केलं आहे प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व करिअर मार्गदर्शक प्रा. केदार टाकळकर यांना. करिअरची निवड कशी करावी हे सांगतानाच टाकळकर सरांनी अनेक गोष्टींची सहज आणि सोप्या शब्दांत उलगड करुन दिली आहे, छानशा टिप्सही दिल्या आहेत. करिअरविषयी विचारात असणाऱ्या प्रत्येकाने जरुर ऐकावा असा हा विशेष...
Published 05/04/24
प्रसिद्ध अभिनेते व चित्रपट निर्माते महेश कोठारे हे मराठी सिनेजगतातील सुपरस्टार. त्यांनी लिहिलेले `डॅम इट आणि बरंच काही...` हे आत्मचरित्र त्यांच्याच आवाजात आता `स्टोरीटेल`वर आले आहे. त्यानिमित्त पुण्यात त्यांचा विशेष गौरव झाला. त्या प्रसंगी  खुद्द महेश कोठारे, ज्येष्ठ साहित्यिक व चित्रपट निर्माते रामदास फुटाणे, सिनेपत्रकार व तारांगणचे संपादक मंदार जोशी यांच्याशी संतोष देशपांडे यांनी संवाद साधला. त्यात कोठारे यांनी या आत्मचरित्रामागची पार्श्वभूमी उलगडून दाखविली, फुटाणे यांनी कोठारे यांच्या...
Published 04/27/24