ओमी वैद्य `आईच्या गावात मराठीत बोल`तो तेव्हा...
Description
`3 इडियटस्` चित्रपटामधील `चतुर` या पात्रातून घरोघरी पोहोचलेला अमेरिकास्थित अभिनेता ओमी वैद्य मराठीमध्ये चित्रपट घेऊन येतो, ही बातमीच तशी अतिशय वेगळी. अमेरिकेत जन्मलेल्या, वाढलेल्या मात्र मराठीशी नाळ कायम ठेऊ पाहणाऱ्या ओमीला मराठीत अभिनेता आणि दिग्दर्शक या दोन्ही भूमिकांतून पुढे यावंसं वाटलं तेव्हा काय घडलं, हा अतिशय आगळा अनुभव ठरला. या चित्रपटाचे कथानक ज्यांच्या शब्दांतून फुलले त्या अमेरिकास्थित लेखिका अमृता हर्डीकर यांनाही यानिमित्ताने आपल्या मायबोलीत प्रेक्षकांपुढे येण्याची संधी नव्याने लाभली. ओमी आणि अमृताने हे शिवधनुष्य कसे पेलले? विशेष म्हणजे, या चित्रपटात `स्टोरीटेल`नेही भूमिका बजावली आहे, ती नेमकी काय आहे...अशा अनेक इंटरेस्टिंग गोष्टींची उलगड करणारा स्टोरीटेल कट्ट्याचा हा स्पेशल पॉडकास्ट प्रत्येकाने आवर्जून ऐकावा. `आईच्या गावात..मराठीत बोल` या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने त्यांचा संतोष देशपांडे यांसमवेत रंगलेला हा संवाद पडद्यावर दिसणाऱ्या कलाकृतीमागच्या दडलेल्या अनेक कथाही नकळत सांगून जातो, असे हे स्टोरीटेलिंग, ऐकायला विसरु नका!
अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक डोनाल्ड ट्रम्प यांनी जिंकली. ते कसे जिंकले, आता ते काय करतील, भारताला त्याचा फायदा आहे का, अमेरिकेतील भारतीय त्याकडे कसे बघतात अशा अनेक प्रश्नांची उकल करण्यासाठी अमेरिकेतील प्रसिद्ध युट्यूबर अमेरिकन भाऊ अर्थात राहुल पाटील यांना बोलतं केलं आहे, संतोष देशपांडे आणि...
Published 11/16/24
कोणतंही गाणं आपल्यापर्यंत पोहोचतं, त्यामागे त्या गायकासह अनेकांचे प्रचंड कष्ट असतात. एरव्ही गाणं म्हणणं आणि ते स्टुडिओत रेकॉर्ड करणं यात मोठा फरक आहे. कला, शास्त्र, तंत्र आणि प्रतिभा या सर्व गुणांचा मिलाफ स्टुडिओत पाहायला मिळतो. याच विषयावर प्रसिद्ध गायक अवधूत गांधी आणि डॉन स्टुडिओत रेकॉर्डिंग...
Published 11/09/24