Episodes
आपल्या कसदार लेखणीतून ग्रामीण मराठी साहित्याला नवे परिमाण मिळवून देणारा लेखक अशी ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव यांची साहित्यजगतात ओळख आहेच. हा व्रतस्थ लेखक आपल्या कट्ट्याच्या श्रोत्यांसाठी बोलता झाला आहे. प्रा. चंदनशिव सरांनी संतोष देशपांडे यांसमवेत संवाद साधताना मराठी साहित्यातील विविध प्रवाह, त्यांचा प्रवास, त्यातील विविध टप्पे यांची उलगड करुन दाखवली आहे. ज्यास आपण समकालीन साहित्य म्हणतो, ते नेमके काय आहे, चिरंतन टिकणारं साहित्य कोणतं इथपासून ते काय वाचावं इथपर्यंत त्यांनी आपल्या चिंतनात...
Published 04/20/24
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञान वेगाने सर्वत्र विस्तारत आहे. या पार्श्वभूमीवर, भविष्यात चांगले करिअर घडण्यासाठी काय शिकायला हवे, कोणता दृष्टिकोन विकसित करावा लागेल, याची माहिती सर्वांना असणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच, स्टोरीटेल कट्ट्यावर याच विषयी मार्गदर्शन केले आहे, स्टोरीटेल इंडियाचे प्रमुख योगेश दशरथ यांनी संतोष देशपांडे यांसमवेत रंगलेल्या या संवादातून. प्रत्येक सजग पालकाने आणि करिअरविषयी गंभीर असणाऱ्या विद्यार्थ्याने ऐकायलाच हवा, असा हा पॉडकास्ट. 
Published 04/13/24
सुनील महाजन म्हणजे आपल्या सांस्कृतिक चळवळीस वाहून घेतलेले एक अवलिया व्यक्तिमत्व. आपल्या `संवाद, पुणे या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आजवर बालनाट्य चळवळ, नाटक, चित्रपट, साहित्य अशा विविध प्रांतांत विलक्षण उत्साहाने अनेक संकल्पना रुजविल्या, त्यातील व्यक्तिमत्वं घडविली, माणसं जोडली आणि त्यांच्या सुखदुःखाच्या क्षणी खंबीरपणे पाठीशीही उभे राहिले. नुकतेच त्यांनी वयाची ६१ वर्षे पूर्ण केली आणि त्यानिमित्त त्यांना संतोष देशपांडे यांनी बोलतं केलं तेव्हा उलगडला तो त्यांचा थक्क करणारा प्रवास. सांस्कृतिक...
Published 04/06/24
आजच्या बदलांचा वेग लक्षात घेता भविष्यातील मानवजीवन, त्याची व्यवस्था, तेव्हाचे जगाचे मानसिक वास्तव याचा भेदक वेध घेणारी विलक्षण कादंबरी प्रसिद्ध लेखक संजय सोनवणी यांनी लिहिली आहे. ती नुकतीच प्रकाशित झाली. त्यानिमित्ताने आजचे भविष्य अन् उद्याचा इतिहास यांच्या दरम्यान उलगड जाणाऱ्या अनेक पैलूंचा वेध एका विलक्षण कथानकातून कसा घेता आला, याची उलगड संजय सोनवणी यांनी संतोष देशपांडे यांच्यासमवेत रंगलेल्या या गप्पांमधून केली आहे. विशेष म्हणजे, एकेकाळी उद्योगक्षेत्रात काळाच्या पुढचा विचार करीत सोनवणी...
Published 04/02/24
मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक म्हणून ओळखले जातात, असे राजकवी भा.रा. तांबे यांच्या कवितांचे गारुड तब्बल शंभर वर्षांहून अधिक काळ रसिकांवर टिकून आहे. जन पळभर म्हणतील हाय हाय, कळा ज्या लागल्या जीवा, नववधु प्रिया मी बावरते, मधु मागसि माझ्या सख्या परि, कशी काळनागिनी, घन तमी शुक्र बघ राज्य करी, तिन्ही सांजा सखे मिळाल्या अशा त्यांच्या कित्येक रचना आपल्या अंतरीचा तळ ढवळतात. अशा या राजकवींचे नातू शिरीष तांबे यांनी संतोष देशपांडे यांसमवेतच्या संवादातून आपल्या आजोबांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या...
Published 03/30/24
देशासाठी आपले सर्वस्व अर्पण करणारे हुतात्मे म्हणजे भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव. 93 वर्षांपूर्वी या तिघांना फाशीवर चढविण्यात आले. मात्र, आपल्या बलिदानातून त्यांनी तरुणाईला देशासाठी निधड्या छातीने जगण्याचा मार्ग दाखवला. त्यांच्या बलिदानाचे स्मरण चिरंतन राखण्यासाठी आजही २३ मार्च शहिद दिन म्हणून पाळला जातो. या शहिदांचा एकमेकांमधील पत्रव्यवहार जेव्हा पुढे आला, तेव्हा त्यांच्या मनातील अंतरंगाची, त्यात दडल्या भावनांची हळवी आणि तितकीच ठाम अशी उलगड होते. ती समाजापुढे आणण्यासाठी हरहुन्नरी असे ज्येष्ठ...
Published 03/23/24
कुटुंबातील महिला ही खरंतर त्या घराला पुढे घेऊन जात असते. घरात कोणी आजारी पडले तरी त्या परिस्थितीला खंबीरपणे सामोरे जाण्याचे धैर्य तिच्यात पुरुषांच्या तुलनेत खचित अधिकच असते. अशी ही स्त्री आजारी पडली तर घरची अख्खी घडी विस्कळीत होऊन जाते. मग, हे असं का घडतं, याचा वैद्यकशास्त्राच्या  दृष्टिकोनातून मागोवा घेतला आहे पुण्यातील प्रसिद्ध भूलतज्ज्ञ डॉ. नेहा कुलकर्णी यांनी, संतोष देशपांडे यांंसमवेत रंगलेल्या या विशेष पॉडकास्टमधून. आपल्या कुटुंबातील स्त्रीला आनंदी राखलं तर तिचं शारीरिक व मानसिक...
Published 03/16/24
हा प्रवास आहे एका विलक्षणाचा शोध घेऊ पाहणाऱ्या तरुणीचा, जिनं अगदी वेगळ्या पद्धतीनं आपल्या आवडीचा मार्ग चोखाळला आणि खगोलविज्ञानाच्या प्रसारासाठी स्वतःला झोकून दिलं. या क्षेत्रातील तिनं एस्टोनएरा हे आपलं पहिलं स्टार्टअप् वयाच्या १८ व्या वर्षी सुरु केलं. तिच्या कामाची दखल घेत तिला रॉयल एस्ट्रानॉमिकल सोसायटी ऑफ लंडनने आपली फेलोशिप प्रदान केली. भेटूया श्वेता कुलकर्णीला. खगोलविज्ञानाच्या प्रसारासाठी अत्यंत उत्साहाने आणि कल्पकतेने जगभरात कार्य करणारी ही पुणेकर तरुणी आज कट्ट्याची मानकरी आहे. तिच्याशी...
Published 03/08/24
आज आपण सर्वजण समाज म्हणून एक विलक्षण अस्वस्थता अनुभवत आहोत. एकमेकांविषयी अविश्वास, मनात काही ना काही निमित्ताने सतत निर्माण होत असणारे काहूर, सार्वजनिक व वैयक्तिक जीवनात बोलताना घसरलेली भाषा अशी अनेक लक्षणे या नव्या सामाजिक `केमिकल लोचा`ची आहेत. हे असे का होते आहे, त्यापासून दूर होऊन आपण स्थिर होत प्रगतीपथावर कसे राहू शकतो, याचा विचार होणं नितांत आवश्यक आहे. ज्येष्ठ संपादक व चिंतनशील विचारवंत श्री. यमाजी मालकर यांनी  संतोष देशपांडे यांसमवेतच्या गप्पांमधून हा विषय अत्यंत प्रभावीपणे उलगडून...
Published 03/02/24
नुकत्याच झालेल्या युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघातील सचिन धस याने आपल्या चमकदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सचिन ज्या बीड शहरातून येतो, तेथे प्रशिक्षणासाठी कोणतीही अनुकूल स्थिती नसतानाही, त्याचे वडील संजय धस यांनी त्याच्या वयाच्या चौथ्या वर्षापासून त्याच्यावर लक्ष केंद्रित केले. अनेक आव्हानांवर आपल्या परीने मार्ग काढीत, शक्य त्यांचे सहकार्य घेत आपल्या सचिनला त्याचा खेळ उंचावण्यासाठी दिशा दिली, ऊर्जा दिली. आपल्या मुलाचा मित्र बनून त्याच्या आयुष्याला आकार दिला. केवळ उत्तम...
Published 02/24/24
नवी दिल्ली येथील प्रगती मैदानावर सध्या `वर्ल्ड बुक फेअर` म्हणजेच जागतिक पुस्तक महोत्सव रंगतो आहे. देशातील एक अत्यंत भव्य आणि देखणा पुस्तक महोत्सव म्हणून जगभरात त्याचा लौकीक असतो. त्याची मुख्य धुरा सांभाळणारे नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष श्री. मिलिंद मराठे यांच्याशी संतोष देशपांडे यांनी थेट महोत्सवात भेट घेऊन संवाद साधला, खास स्टोरीटेल कट्ट्यासाठी. जरुर ऐका आणि इतरांनाही ऐकवा. 
Published 02/16/24
उद्योजकतेच्या वाटेवर पुस्तकं, माणसं, अनुभव जे जे काही लाभते, त्यातून आपल्यातील सकारात्मकता आणखी वाढवत नेली की नवी दिशा मिळू शकते. तुमचा सूर तुम्हाला गवसू शकतो. व्यवसायाचा कोणताही पूर्वानुभव नसताना, उद्योजकतेची कास धरत लाभलेल्या संधी, भेटलेली माणसं, सूचलेल्या कल्पना आणि आलेले अनुभव या शिदोरीवर उमेश पवार या तरुणाने रिअल इस्टेट सारख्या क्षेत्रात आपला ठसा उमटविला. मागे वळून पाहताना, आता त्याला काय वाटते, कोणते अनुभव आले, त्यातून काय शिकता आले याची विलक्षण उलगड होते, ती त्याच्या संतोष देशपांडे...
Published 02/10/24
चित्रपटसृष्टी, कलाकार यांविषयी आकर्षण सर्वांनाच असते. मात्र, या क्षेत्राला वाहिलेले मासिक, प्रकाशन सुरु करणे आणि ते अव्याहत चालवणे, हे कार्य प्रत्यक्षात किती आव्हानात्मक असते, याची सर्वांनाच कल्पना असते असे नाही. मनोरंजन क्षेत्रातील एक आघाडीचे मराठी मासिक म्हणून वाचकप्रिय असलेल्या `तारांगण`ने नुकतीच आपली १२ वर्षे पूर्ण केली. त्यानिमित्ताने, `तारांगण`चे संपादक व ज्येष्ठ सिनेपत्रकार मंदार जोशी यांच्याशी संतोष देशपांडे यांनी साधलेल्या या संवादातून तारांगणची आजवरची वाटचाल, त्यातील महत्त्वाचे...
Published 02/03/24
अयोद्धानगरीत श्रीराम लल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देश राममय झाला. याच काळात, स्टोरीटेलवर `रामराज्य कथा` ही येऊन दाखल झाली. रामराज्य म्हणजे नेमके काय, त्या काळात असे काय होते ज्यामुळे त्यास रामराज्य म्हटले जायचे, तेव्हाचे समाजजीवन कसे होते, समाजापुढचे आदर्श काय होते, परस्परांशी व्यवहार कसे होते या व अशा अनेक गोष्टींची विलक्षण उलगड रामराज्य कथा करतात. या `रामराज्य`ची संकल्पना ज्यांच्यामुळे साकारली ते योगेश दशरथ आणि लेखक संजय सोनवणी यांच्यासमवेत संतोष देशपांडे यांनी साधलेला संवाद,...
Published 01/27/24
देशातील शालेय शिक्षणाची स्थिती मांडणारे सर्वेक्षण एन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट (असर) नुकतेच समोर आले. यातील निरीक्षणे गंभीर आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता खालावली असल्याचे त्यातून दिसून येते. विशेषतः आपल्या मातृभाषेतील सोपा परिच्छेद आठवीतील अनेक विद्यार्थ्यांना वाचता येत नाही. सोपी गणिते सोडविता येत नाहीत, अशा अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या. या पार्श्वभूमीवर आपण नेमके कोठे चुकतो आहोत, ही स्थिती सुधारण्यासाठी काय करायला हवे, शाळा, शिक्षक व पालक...
Published 01/20/24
`3 इडियटस्` चित्रपटामधील `चतुर` या पात्रातून घरोघरी पोहोचलेला अमेरिकास्थित अभिनेता ओमी वैद्य मराठीमध्ये चित्रपट घेऊन येतो, ही बातमीच तशी अतिशय वेगळी. अमेरिकेत जन्मलेल्या, वाढलेल्या मात्र मराठीशी नाळ कायम ठेऊ पाहणाऱ्या ओमीला मराठीत अभिनेता आणि दिग्दर्शक या दोन्ही भूमिकांतून पुढे यावंसं वाटलं तेव्हा काय घडलं, हा अतिशय आगळा अनुभव ठरला. या चित्रपटाचे कथानक ज्यांच्या शब्दांतून फुलले त्या अमेरिकास्थित लेखिका अमृता हर्डीकर यांनाही यानिमित्ताने आपल्या मायबोलीत प्रेक्षकांपुढे येण्याची संधी नव्याने...
Published 01/13/24
विषय अत्यंत दाहक... स्टोरीटेल वर प्रचंड गाजलेल्या 'पेटलेले मोरपीस' या मालिकेचा तिसरा सिझन तितकाच जबरदस्त हीट झाला. 'त्या' आणि 'तशा' विषय  मुक्तपणे भाष्य करणार्‍या एका 'क्रांतिकारी' कथानकाची ही छोटी झलक! शब्द: नितीन थोरात, आवाज: उर्मिला निंबाळकर  संपूर्ण गोष्ट ऐकण्यासाठी क्लिक करा- https://storytel.com/in/en/books/petlela-morpis-se03e01-2531061?appRedirect=true
Published 01/07/24
मुंबईच्या डॉ. मनिषा अन्वेकर या दर महिन्यात स्वतःचं एक पुस्तक लिहितात. आजवर त्यांची ७५ पुस्तकं एकही महिना न चुकता प्रकाशित झालेली आहेत. अध्यात्मिक समूपदेशक म्हणून कार्यरत असताना, त्यांना विविध विषयांवरील पुस्तक लेखनाची प्रेरणा मिळाली आणि ते एक व्रतच बनले. अशा या अनोख्या पुस्तकप्रपंचामागे नेमके काय आहे, त्यांना हे कसे शक्य होते, त्यांचे कार्य नेमके कसे चालते, अध्यात्मिक समूपदेशन म्हणजे नेमके काय या व अशा अनेक बाबींवर त्यांना बोलते केलं आहे, संतोष देशपांडे यांनी. `हॅपी न्यू इअर` असं म्हणत...
Published 12/30/23
सेल्फ पब्लिशिंग म्हणजे लेखकाने प्रकाशनसंस्थेशिवाय स्वतःच आपले पुस्तक प्रसिद्ध करणे. हे क्षेत्र आता झपाट्याने विस्तारते आहे. अनेक होतकरु लेखकांना त्यामुळे स्वतःच्या पुस्तकाचे स्वप्न साकारता येऊ लागले आहे. अशा लेखकांना एकमेकांना साहाय्य करीत या क्षेत्रात पुढे वाटचाल करण्याच्या दृष्टीने अॅस्पायरिंग ऑथर्स अलायन्स ऑफ इंडिया (एएएआय) अशी संघटनाही बांधली आहे. पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी प्रथमच आपला सहभाग नोंदविला. या पार्श्वभूमीवर, या चळवळीविषयी व एकूणच सेल्फ पल्बिशिंगच्या क्षेत्राची...
Published 12/23/23
गिरनार येथील उत्तुंग अशा गुरुशिखरावर जाऊन दत्तगुरुंचे दर्शन घेणं ही असंख्य दत्तभक्तांची अत्यंत तीव्र अशी इच्छा असते. मात्र, केवळ मनात येऊन उपयोगाचं नाही, तर तो योग दत्तगुरुच घडवून आणतात, असाच अनेकांचा अनुभव आहे.  गिरनारवरील १० हजार पायऱ्या चढणे एक मोठे आव्हान दत्तगुरुंच्या कृपेतून सहज यशस्वी होते. स्टोरीटेल कट्टाचे संवादक संतोष देशपांडे यांनी नुकताच असा अनुभव घेतला. त्याविषयी, त्यांच्याच शब्दांत ऐका `ते मंतरलेले ५ तास`. गिरनारची ओढ असणाऱ्या सर्वांनीच ऐकावा अन् इतरांनाही ऐकवावा, असा हा वेगळा...
Published 12/16/23
विक्री ही एक कला आहे, असे मानले जाते. तरीही जगभर अशा कोणत्या बाबी आहेत, ज्यांना कायम मागणी असते. य  बाबतीत कोणत्या पुस्तकात काय सांगितले गेले आहे...एका अतिशय वेगळया विषयी योगेश दशरथ आणि संतोष देशपांडे यांच्यात रंगलेला हा पॉडकास्ट. 
Published 12/09/23
`स्टोरीटेल`ने नुकतीच भारतातील आपली सहा वर्षे पूर्ण केली. या सहा वर्षांचा मागोवा घेता, `स्टोरीटेल`ने भारतीय, विशेषतः मराठी रसिकांना काय दिलं, याचा लेखाजोखा मांडला आहे, स्टोरीटेल इंडियाचे प्रमुख योगेश दशरथ यांनी. श्राव्य पुस्तकांची म्हणजेच ऑडिओबुक्सची सवय आता मराठी वाचकांना लागली आहे, या पार्श्वभूमीवर, आपल्याकडे हे क्षेत्र कितपत रुजले आहे, पॉडकास्टिंगमध्ये `स्टोरीटेल कट्टा` कसा लोकप्रिय ठरला, `स्टोरीटेल`चे विस्तारधोरण बदलले आहे का या व अशा अनेक प्रश्नांची स्पष्ट शब्दांत उत्तरे यातून आपणास...
Published 12/02/23
२७ नोव्हेंबर म्हणजे `स्टोरीटेल इंडिया`चा वर्धापनदिन. हा सहावा वर्धापनदिन एका वेगळ्या उपक्रमातून साजरा झाला. तो होता, रसिकप्रिय लेखक सुहास शिरवळकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ, त्यांची अमृतजयंती साजरी करताना, एका राज्यस्तरीय कादंबरीलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे विजेते ठरले ते चेन्नईत राहणारे मराठी साहित्यिक रवींद्र भयवाल. त्यांची `मिशन गोल्डन कॅटस्` ही कादंबरी नेमकी काय आहे, ती साकारताना त्यांचे अनुभव काय आहेत, एकूणच ही स्पर्धा आणि तिची आयोजक आणि लेखक या दोन्ही बाजूंची प्रक्रिया...
Published 11/28/23
मानसशास्त्राची उत्कंठावर्धक सफर करणारी अच्युत गोडबोले यांची कादंबरी म्हणजे "मनात". मानसशास्त्राच्या उगमापासून आत्तापर्यंतचा संपूर्ण प्रवास यात मांडलेला आहे. देव आणि दानव यांनी समुद्रमंथन करून ज्याप्रमाणे अमृत बाहेर काढलं त्याचप्रमाणे वैचारिक मंथन करून मानसशास्त्रासारखा कठीण विषयसुध्दा श्री. गोडबोले यांनी अत्यंत सोप्या शब्दात मांडला आहे. अशा या `मनात`ची झलक ऐका, संदीप खरे यांच्या आवाजात! `मनात` संपूर्ण ऐकण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा-...
Published 11/25/23
डॉक्टरकीचं शिक्षण घेत असतानाच त्यानं लिहिलेलं पहिलं इंग्रजी पुस्तक प्रकाशित झालं. त्याचा उत्तम प्रतिसाद मिळाला. पुढचं पुस्तक तर बेस्ट सेलरच्या यादीच झळकलं. देशभरात आता त्याची ओळख एक आघाडीचा इंग्रजी रोमॅंटिक लेखक म्हणून बनली आहे. पुण्यातील आदित्य निघोटची गोष्ट लय भारी आहे. एकीकडे डॉक्टरकी आणि दुसरीकडे लेखनप्रपंच सांभाळत हा तरुण लेखक स्वतःचा वाचकवर्ग निर्माण करतो आहे. डॉ. आदित्यचा आजवरचा भन्नाट लेखनप्रवास उलगडणारा स्टोरीटेल कट्ट्यावरील हा विशेष पॉडकास्ट प्रत्येक युवा लेखकाने ऐकायला हवा. 
Published 11/18/23