Description
मांधाता हा यूवनश्विन नावानेही ओळखला जातो. याचा अर्थ आ हे, युवनावश्वचा पुत्र जे एक महान राजा होते. ज्यांची प्रशंसा महाभारतात देखील केलेली आहे. मांधाताची जन्म कहाणी कोणत्या चमत्कारापेक्षा कमी नाही.
सूर्यवंशामध्ये युवनावश्व नावाचा एक राजा होता. त्यांचे राज्य समृध्द होते. सेना मजबूत होती. एवढंच नाही तर त्यांची प्रजाही त्यांच्यावर खूष होती. तसेच त्यांनी त्यांच्या आयुष्यात शेकडो अश्वमेध यज्ञ केले होते. एवढं ऐश्वर्य, यश असूनसुद्धा राजाला एकच चिंता सतावत होती, की राजाला पुत्र नव्हता.
गणेशपुराणात शौनक ऋषी सूतांना गणेशाचा गजानन कसा झाला याची कथा विचारतात. सूत मुनी त्यांना तीच कथा ऐकवतात जी नारायणाने नारद मुनींना ऐकवली होती.
एकदा देवराज इंद्र पुष्पभद्रा नदीच्या शांत आणि सुंदर किनारी उभे होते. त्या निर्मनुष्य क्षेत्रात अनेक सुंदर
फुले आणि झाडे लावलेली होती.
Published 02/08/23
श्रोतेहो, सूत्रधार मध्ये आज आपण स्यमंतक मण्याबद्दलची कथा ऐकूया. स्यमंतक मणि हे असं एक रत्न होतं. ज्यामध्ये स्वतः भगवान सूर्यदेव यांचं तेज समाविष्ट झालेलं होतं. हा मणी ज्या राज्यात असेल ते राज्य धनधान्याने समृद्ध असे. हा मणी आपल्याचजवळ असावा असं प्रत्येकाला वाटे.
एकदा साक्षात भगवान...
Published 02/01/23