Description
पहिला भाग : श्रीकृष्णाचे वैकुंठ गमन
द्वापार युगाचा अंत जवळ येऊन ठेपला होता. ‘महाभारत’ युद्ध होऊन छत्तीस वर्ष झाली होती. गांधारीच्या शापानुसार, सात्यकी आणि कृतवर्मांच्या युद्धाने सुरू झालेल्या मतभेदाने आता संपूर्ण यादव वंश संपवला होता. बलराम स्वगृही परतल्यानंतर भगवान श्रीकृष्ण आता पूर्णपणे एकटे पडले होते. आता त्यांनी उर्वरित आयुष्य जंगलात घालवण्यास सुरवात केली. एके दिवशी वनवासी जारा शिकारीच्या शोधात जंगलात फिरत होता. जाराला झुडूपांमध्ये एक हरिण असल्याचं लक्षात आलं, त्याने धनुष्य व्यवस्थित तयार ठेवलं आणि हरणावर बाण सोडला. जाराचं लक्ष्य अभेद्य होतं. गडद लाल रक्ताचा प्रवाह पाहताच जाराला तो विजयी झाल्याचं समजलं. मग त्याला हृदय पिळवटून टाकणाऱ्या आर्त आक्रोशाने काही काळ हादरवून टाकलं, त्याचा बाण हरिणाला न लागता चुकून माणसाला लागला होता.
जारा समोरचं दृश्य पाहून स्वत:वरच खूप रागावला आणि पश्चात्तापदग्ध झाला; कारण हरीण आहे असं समजून त्याने मारलेला बाण झुडुपामध्ये विश्रांती घेणाऱ्या एका माणसाच्या पायामध्ये घुसला होता. तो मनुष्य म्हणजे दुसरातिसरा कोणी नसून साक्षात द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण होते. त्या परिस्थितीत भेदरलेल्या जारानं आपल्या पापाची शिक्षा म्हणून स्वत:च्याही मृत्यूसाठी देवाकडे प्रार्थना केली.
स्वतःच्या नशिबाला दोष देत रडणाऱ्या जाराला पाहून भगवान श्रीकृष्ण जरासे हसले. ज्यांनी अधर्माचा अंत करण्यासाठी महाभारताची रचना केली, त्यांना स्वतःच्या पूर्वनिर्धारित मृत्यूची पद्धत कशी माहित नसेल? द्वापार युगात जारा हा भगवान श्रीकृष्णांच्या हत्येचं कारण ठरणार नाही तर त्यांच्या पार्थिव शरीराचा मुक्तीदाताच ठरणार आहे. हे सर्व पूर्वनिर्धारित होतं, असं सांगून शोकाकूल जाराचं भगवान श
गणेशपुराणात शौनक ऋषी सूतांना गणेशाचा गजानन कसा झाला याची कथा विचारतात. सूत मुनी त्यांना तीच कथा ऐकवतात जी नारायणाने नारद मुनींना ऐकवली होती.
एकदा देवराज इंद्र पुष्पभद्रा नदीच्या शांत आणि सुंदर किनारी उभे होते. त्या निर्मनुष्य क्षेत्रात अनेक सुंदर
फुले आणि झाडे लावलेली होती.
Published 02/08/23
श्रोतेहो, सूत्रधार मध्ये आज आपण स्यमंतक मण्याबद्दलची कथा ऐकूया. स्यमंतक मणि हे असं एक रत्न होतं. ज्यामध्ये स्वतः भगवान सूर्यदेव यांचं तेज समाविष्ट झालेलं होतं. हा मणी ज्या राज्यात असेल ते राज्य धनधान्याने समृद्ध असे. हा मणी आपल्याचजवळ असावा असं प्रत्येकाला वाटे.
एकदा साक्षात भगवान...
Published 02/01/23