Description
द्वापार युग संपलं आणि कलियुगाला सुरुवात होऊन काही वर्षं झाली होती. निषाद राजा विश्ववसू याचा जन्म सबर कुळात झाला. तो उत्कल राज्यात एका आदिवासी कबिल्याचा सरदार होता. एके दिवशी जंगलात शिकार करायला निघालेला विश्ववसू रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही म्हणून त्याची पत्नी, मुलगी आणि समुहातील इतर सदस्य काही अनुचित गोष्टींच्या भीतीने थरथर कापू लागले. बरेच दिवस आदिवासी सैनिकांनी विश्ववसूच्या शोधात रात्रीचा दिवस केला, पण त्यांना त्यांच्या राजाचा ठावठिकाणा कुठेही सापडला नाही. त्यामुळे थकून भागून प्रत्येकजण विश्वावसूच्या आरोग्यासाठी दु:खी मनाने प्रार्थना करू लागला.
जंगलातल्या एका अस्वलाचा पाठलाग करता करता विश्वावसू रस्ता चुकला. खरंतर तो अनेकदा या जंगलात शिकार करण्यासाठी येत असे, पण आज मात्र त्याला जंगलातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नव्हता. कदाचित एखादी मायावी शक्ती त्याला या जंगलातून बाहेर पडू देत नसावी. शेवटी, बर्याच प्रयत्नांनंतर तो थकून एका झाडाखाली विश्रांतीसाठी बसला. थोड्या वेळाने, त्याच झाडापासून थोड्या अंतरावर असलेल्या गुहेतून चमकणाऱ्या एका वस्तूने त्याचं लक्ष वेधून घेतलं. कुतूहल वाटल्यामुळे विश्वावसू गुहेतून येणाऱ्या प्रकाशाच्या दिशेने जाऊ लागला. तो जेवढा गुहेजवळ जात होता, तेवढा गुहेमधून येणारा प्रकाश अधिक तेजस्वी होऊ लागला. अशाप्रकारे त्या प्रकाशाचा मागोवा घेत घेत अखेर त्याने गुहेत प्रवेश केला.
गुहेत प्रवेश करताच विश्ववसुला मन शांत वाटू लागलं. त्या गुहेत अद्भुत शांतता होती. का कोण जाणे पण थोड्या वेळापूर्वी या जंगलातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या निशादराजाला आता या गुहेत कायमचं राहावं असं वाटू लागलं. तरीही उत्सुकतेने त्याने गुहेतून जिथून प्रकाश येत होता त्याच द
गणेशपुराणात शौनक ऋषी सूतांना गणेशाचा गजानन कसा झाला याची कथा विचारतात. सूत मुनी त्यांना तीच कथा ऐकवतात जी नारायणाने नारद मुनींना ऐकवली होती.
एकदा देवराज इंद्र पुष्पभद्रा नदीच्या शांत आणि सुंदर किनारी उभे होते. त्या निर्मनुष्य क्षेत्रात अनेक सुंदर
फुले आणि झाडे लावलेली होती.
Published 02/08/23
श्रोतेहो, सूत्रधार मध्ये आज आपण स्यमंतक मण्याबद्दलची कथा ऐकूया. स्यमंतक मणि हे असं एक रत्न होतं. ज्यामध्ये स्वतः भगवान सूर्यदेव यांचं तेज समाविष्ट झालेलं होतं. हा मणी ज्या राज्यात असेल ते राज्य धनधान्याने समृद्ध असे. हा मणी आपल्याचजवळ असावा असं प्रत्येकाला वाटे.
एकदा साक्षात भगवान...
Published 02/01/23