Description
श्रीकृष्ण, बलराम आणि सुभद्रा यांच्या मूर्तींची निर्मिती आणि मंदिराचंबांधकाम पूर्ण झालं. आता फक्त त्यांची प्रतिष्ठापना करायची राहिली होती. पणयातही अडथळा निर्माण झाला, ज्या भगवान जगन्नाथांची मूर्ती जी कोणत्याहीमनुष्याला निर्माण करणं अशक्य होतं, तिची प्रतिष्ठापना सामान्य ब्राह्मण कसाकरू शकेल? यासाठी कदाचित देवर्षी नारद किंवा देवगुरू बृहस्पती यांच्यासारख्यादैवी ऋषींची आवश्यकता होती.राजा इंद्रद्युम्न तपश्चर्येला बसला. थोड्या वेळाने, जेव्हा कोणीतरी हाकमारली तेव्हा राजाने ध्यान सोडलं. त्याच्यासमोर साक्षात देवर्षी नारद उभेहोते. त्याने देवर्षी नारदांना वंदन केलं. राजाने त्यांच्याकडे मंदिर आणि मूर्तींच्यास्थापनेविषयी मार्गदर्शन करण्याची विनंती केली.देवर्षी नारद राजाला म्हणाले, "नारायण, नारायण! राजन, तू म्हणतोस तेबरोबर आहे. जे रूप मूर्तींमध्ये साकारण्यासाठी देवशिल्पी विश्वकर्माला यावंलागलं, त्या मूर्तींची प्रतिष्ठापना केवळ तोच करू शकतो जो त्रैलोक्यातीलसर्वश्रेष्ठ वेदज्ञ आहे.राजाने पुन्हा विचारलं, "क्षमा करा देवर्षी, पण तुम्ही आणि देवगुरु बृहस्पतीव्यतिरिक्त असा कोण पारंगत विद्वान आणि उत्कृष्ट ब्राह्मण आहे जो हेकार्य तडीस नेईल?”"हे राजन, मी त्यांच्या विषयी बोलतो आहे, ज्यांच्या मुखातून समस्तवेदांची उत्पत्ती झाली आहे ते माझे पिता ब्रह्मदेवांच्याच हस्ते भगवान श्रीहरींचं हेकार्य संपन्न होईल."
इंद्रद्युम्न आनंदाने म्हणाला, “ हे तर माझं भाग्यच!देवर्षी तुमची आज्ञाअसेल तर मी लगेच आपल्याबरोबर ब्रह्मलोकात येऊन प्रजापिता ब्रह्मदेवांनाआमंत्रण देऊ इच्छितो.""अवश्य राजन, तू जरूर ये." देवर्षी त्याला आपल्यासह सदेह ब्रह्मलोकात घेऊनजाण्यास तयार झाले.”इंद्रद्युम्नाने विद्यापति, विश्वावसू आण
गणेशपुराणात शौनक ऋषी सूतांना गणेशाचा गजानन कसा झाला याची कथा विचारतात. सूत मुनी त्यांना तीच कथा ऐकवतात जी नारायणाने नारद मुनींना ऐकवली होती.
एकदा देवराज इंद्र पुष्पभद्रा नदीच्या शांत आणि सुंदर किनारी उभे होते. त्या निर्मनुष्य क्षेत्रात अनेक सुंदर
फुले आणि झाडे लावलेली होती.
Published 02/08/23
श्रोतेहो, सूत्रधार मध्ये आज आपण स्यमंतक मण्याबद्दलची कथा ऐकूया. स्यमंतक मणि हे असं एक रत्न होतं. ज्यामध्ये स्वतः भगवान सूर्यदेव यांचं तेज समाविष्ट झालेलं होतं. हा मणी ज्या राज्यात असेल ते राज्य धनधान्याने समृद्ध असे. हा मणी आपल्याचजवळ असावा असं प्रत्येकाला वाटे.
एकदा साक्षात भगवान...
Published 02/01/23