Description
प्राचीन काळी पृथ्वी लोकात प्रभंजन नावाचा एक बलाढ्य राजा होऊन गेला. एकदा तो जंगलात शिकारीसाठी गेला होता. तेव्हा जंगलात फिरत असताना अचानक त्याची दृष्टी एका झुडुपामागच्या हरिणीवर पडली. तिला पाहताच राजानं तिला बाण मारला.
बाण लागल्यानं जखमी झालेल्या हरिणीने जेव्हा हातात धनुष्यबाण घेतलेल्या राजा प्रभंजनला पाहिले तेव्हा ती म्हणाली, “अरे मूर्ख राजा, तू हे काय केलंस? इथे मी खाली वाकून निर्भिडपणे माझ्या पाडसाला दूध पाजत होते आणि अशा अवस्थेत असताना माझ्या निरपराध जिवाला तू आपल्या बाणाने लक्ष्य केलंस. तू हे पापकर्म केलं आहेस. मी तुला शाप देते की, या जंगलात कच्चं मांस खाणारा प्राणी म्हणून तुला जीवन व्यतीत करावं लागेल."
गणेशपुराणात शौनक ऋषी सूतांना गणेशाचा गजानन कसा झाला याची कथा विचारतात. सूत मुनी त्यांना तीच कथा ऐकवतात जी नारायणाने नारद मुनींना ऐकवली होती.
एकदा देवराज इंद्र पुष्पभद्रा नदीच्या शांत आणि सुंदर किनारी उभे होते. त्या निर्मनुष्य क्षेत्रात अनेक सुंदर
फुले आणि झाडे लावलेली होती.
Published 02/08/23
श्रोतेहो, सूत्रधार मध्ये आज आपण स्यमंतक मण्याबद्दलची कथा ऐकूया. स्यमंतक मणि हे असं एक रत्न होतं. ज्यामध्ये स्वतः भगवान सूर्यदेव यांचं तेज समाविष्ट झालेलं होतं. हा मणी ज्या राज्यात असेल ते राज्य धनधान्याने समृद्ध असे. हा मणी आपल्याचजवळ असावा असं प्रत्येकाला वाटे.
एकदा साक्षात भगवान...
Published 02/01/23