जरसंधाचा मथुरेवर हल्ला
Listen now
Description
श्रीकृष्णाच्या हातून झालेल्या कंसाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी क्रोधाने आंधळा झालेल्या जरसंधाने मथुरेवर हल्ला करायचे ठरवले.  जरसंधाने आपल्या सेनेसह मधुरेला घेरले आणि श्रीकृष्ण-बालरम दोघांना युद्धाचे आव्हान दिले. मथुरावासीयांनी श्रीकृष्ण आणि बालरम दोघांचा पराक्रम या पूर्वीही पाहिला होता त्यामुळे ते निश्चिंत होते.  श्रीकृष्ण आणि बलराम दोघांनी आपल्या यादव सेनेला जरसंधाच्या सेनेसमोर आणून उभे केले. मगधाच्या सेनेचे संख्याबळ जास्त असले तरी तिच्याकडे कृष्णबलरामाच्या सेने सारखे युद्ध कौशल्य नव्हते.   जेव्हा जरासंध आणि बलराम दोघांचा एकमेकांशी सामना झाला तेव्हा जरासंधाला बलराम एक असा कोवळा तरुण वाटला जो त्याच्या समोर अजिबातच टिकू शकणार नाही... म्हणूनच जरासंधाने बलरामाला द्वंद्व युद्धाचे आव्हान दिले. जरासंधासोबत द्वंद्व युध्द करण्यासाठी उतावीळ झालेल्या बलरामाला पाहून श्रीकृष्णाच्या चेहर्‍यावर हसू पसरलं. दोन्ही योद्धा लढू लागले आणि काही वेळातच बलरामाने जरसंधाला परास्त केले.   बलराम, जरासंधाला जमिनीवर आपटून आता आपल्या गदेने त्याच्यावर प्रहार करणार तोच त्याला हाक ऐकू आली, "दादा थांबा"    चकित होऊन बलरामाने आपल्या छोट्या भावाकडे श्रीकृष्णाकडे पहिलं आणि जरासंधाच्या छातीवर पाय ठेऊन श्रीकृष्णाला विचारलं, "तुझा नक्की हेतू काय आहे. आज मी याचा काल बनून याचं जीवन समाप्त करू शकतो, तर मग तू मला का थांबवतो आहेस?"   हसतहसत श्रीकृष्ण उत्तरला, "आपण नुकताच याच्या जावयाचा वध करून याच्या मुलींना विधवा केलं आहे त्यामुळे त्याचं असं संतापणं रास्त आहे. याला शहाणपण शिकण्यासाठी आपण अजून एक संधी दिली पाहिजे"  असं अर्ध्यात थांबवल्यामुळे बलराम चिडला होता पण त्याचा श्रीकृष्णाच्या बुद्धिमत्तेवर पूर्ण विश्वास हो
More Episodes
गणेशपुराणात शौनक ऋषी सूतांना गणेशाचा गजानन कसा झाला याची कथा विचारतात. सूत मुनी त्यांना तीच कथा ऐकवतात जी नारायणाने नारद मुनींना ऐकवली होती. एकदा देवराज इंद्र पुष्पभद्रा नदीच्या शांत आणि सुंदर किनारी उभे होते. त्या निर्मनुष्य क्षेत्रात अनेक सुंदर फुले आणि झाडे लावलेली होती.
Published 02/08/23
श्रोतेहो, सूत्रधार मध्ये आज आपण स्यमंतक मण्याबद्दलची कथा ऐकूया. स्यमंतक मणि हे असं एक रत्न होतं. ज्यामध्ये स्वतः भगवान सूर्यदेव यांचं तेज समाविष्ट झालेलं होतं. हा मणी ज्या राज्यात असेल ते राज्य धनधान्याने समृद्ध असे. हा मणी आपल्याचजवळ असावा असं प्रत्येकाला वाटे.   एकदा साक्षात भगवान...
Published 02/01/23