Description
भूलोकी अनेक वर्ष धर्माने राज्य करून शौर्य आणि वैभव अर्जित केल्यानंतर असं काय घडलं ज्यामुळे नहुष महाराजांना देवांचा राजा बनावं लागलं. पहा कसा होता देवराजा नहुषाचा कार्यकाल...
युगानुयुगे स्वर्गलोकवर राज्य केल्यानंतर इंद्रला ऐश्वर्याची चटक लागली होती आणि त्याच्या मनात या बद्दल अहंकार जागा झाला. एका काय झालं, इंद्रलोकी नेहेमी प्रमाणे उत्सवाचं वातावरण होतं. देवी शची सह आपल्या आसनावर विराजमान झालेला इंद्र नृत्य आणि गायनाचा आनंद घेत होता. देवता, ऋषि, मुनी, मरुदगण, दिग्पाल, गंधर्व, नाग तथा अप्सरा चारही बाजूंनी इंद्रची पूजा करण्यात मग्न होते. आधीच गर्वाने फुगलेल्या इंद्राला या जयजय कारामुळे अजूनच उकळ्या फुटत होत्या. त्याच वेळी देवगुरू बृहस्पतींच इंद्रलोकी आगमन झालं, देवगुरूना येताना पाहून ना इंद्राने उठून त्यांना अभिवादन केलं की ना बृहस्पतींना आसन ग्रहण करण्यास आमंत्रण दिलं.
बृहस्पतींना याचं खूप वाईट वाटलं आणि त्यांनी त्याचवेळी इंद्रसभेचा परित्याग करण्याचा निर्णय घेतला. बृहस्पती निघून गेल्यानंतर इंद्राला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि तो आपल्या गुरूंची माफी मागण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोचला. परंतू इंद्राने तिथे पोहोचायला उशीर केला. देवराजाच्या वागण्यावर रागावलेले बृहस्पती तिथून निघून गेले होते. त्यामुळे दुःखी मनाने इंद्र आपल्या महाली परतला. ज्यांच्या ठायी असीम तपोबाल होतं त्या बृहस्पतींच्या अशा निघून जण्याने देवतांची शक्ती जवळजवळ निम्मी झाली आणि जसजसा काळ निघून जाऊ लागला ती अजूनच कमी कमी होऊ लागली. ही बातमी जेव्हा असुरांना कळली तेव्हा त्यांनी लागलीच या संधीचा फायदा घेऊन स्वर्गावर आक्रमण केलं.
देवगुरूंच्या अनुपस्थितीत देवतांना आवश्यक त्या शक्तीही मिळत नव्हत्या ना सटीक मा
गणेशपुराणात शौनक ऋषी सूतांना गणेशाचा गजानन कसा झाला याची कथा विचारतात. सूत मुनी त्यांना तीच कथा ऐकवतात जी नारायणाने नारद मुनींना ऐकवली होती.
एकदा देवराज इंद्र पुष्पभद्रा नदीच्या शांत आणि सुंदर किनारी उभे होते. त्या निर्मनुष्य क्षेत्रात अनेक सुंदर
फुले आणि झाडे लावलेली होती.
Published 02/08/23
श्रोतेहो, सूत्रधार मध्ये आज आपण स्यमंतक मण्याबद्दलची कथा ऐकूया. स्यमंतक मणि हे असं एक रत्न होतं. ज्यामध्ये स्वतः भगवान सूर्यदेव यांचं तेज समाविष्ट झालेलं होतं. हा मणी ज्या राज्यात असेल ते राज्य धनधान्याने समृद्ध असे. हा मणी आपल्याचजवळ असावा असं प्रत्येकाला वाटे.
एकदा साक्षात भगवान...
Published 02/01/23