Description
आपल्या अहंकारामुळे अगस्त्य ऋषींच्या शापाचा धनी झालेल्या नहूषाने पृथ्वीवर अनेक वर्षे एका अजगराच्या रुपात काढली. शेवटी नहुषाचा उद्धार कसा झाला हे आपण नहुषाच्या गोष्टीच्या या भागात पाहू.
एकेकाळी इंद्र असलेल्या नहुषाचे पृथ्वीवर एका सापाच्या रुपात अधःपतन झाल्याला हजारो वर्षे लोटली होती. महर्षि अगस्त्य यांच्या शापामुळे इतक्या वर्षांच्या काळानंतरही नहुषाला हे सगळं व्यवस्थित लक्षात होतं. त्याला हे माहित होतं की तो चंद्रवंशी सम्राट आयु यांचा पुत्र आहे, तसेच मिळालेले इंद्रपद स्वतःच्या अहंकारामुळे गमावणारा एक अभागी पुरुषदेखील आहे. सर्परूपी स्वतःची चूक सदैव आठवत आणि त्याबद्दल पश्चात्ताप करत असे, आणि मुक्तीची वाट पहात बसे. हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या सरस्वती नदी किनारी सर्परुपात राहणारा नहुष जीवजंतू आणि जवळ आलेल्या माणसांना खाऊन आपली भूक भागवत असे. अशा रीतीने आयुष्य घालवत असताना आता नहुष द्वापार युगात येऊन पोचला होता.
वनवासकाळात पांडव फिरत फिरत याच वनात आले जेथे नहुष रहात होता. एकदा अन्नाच्या शोधात भीम चुकून नहुषच्या जवळ गेला. बऱ्याच दिवसांपासून उपाशी असलेल्या नहुषाने भीमाला बघून त्याला खायचा निश्चय केला. सर्परूपी नहुषच्या विशाल आकाराने चकित झालेला भीम क्षणभर जागीच थांबला. जिभल्या चाटत नहुष पुढे झाला. आपल्या बळाचा कायम गर्व असलेल्या भीमाला आज एक साप पकडू पाहत होता आणि सुटण्याची खूप धडपड करुनही भीमाला त्याच्या तावडीतून सुटता येईना. भीमाला नहुष खाऊन टाकणार इतक्यात तेथे धर्मराज युधिष्ठीर आला. भीम इतका वेळ का परतला नाही या चिंतेत युधिष्ठीर त्याला शोधत तेथे आला होता. आपल्या महा-बलशाली भावाला एका सापाच्या तावडीत सापडलेला पाहुन युधिष्ठिराच्या ये लक्षात आलं की हा कुणी साधासुधा साप
गणेशपुराणात शौनक ऋषी सूतांना गणेशाचा गजानन कसा झाला याची कथा विचारतात. सूत मुनी त्यांना तीच कथा ऐकवतात जी नारायणाने नारद मुनींना ऐकवली होती.
एकदा देवराज इंद्र पुष्पभद्रा नदीच्या शांत आणि सुंदर किनारी उभे होते. त्या निर्मनुष्य क्षेत्रात अनेक सुंदर
फुले आणि झाडे लावलेली होती.
Published 02/08/23
श्रोतेहो, सूत्रधार मध्ये आज आपण स्यमंतक मण्याबद्दलची कथा ऐकूया. स्यमंतक मणि हे असं एक रत्न होतं. ज्यामध्ये स्वतः भगवान सूर्यदेव यांचं तेज समाविष्ट झालेलं होतं. हा मणी ज्या राज्यात असेल ते राज्य धनधान्याने समृद्ध असे. हा मणी आपल्याचजवळ असावा असं प्रत्येकाला वाटे.
एकदा साक्षात भगवान...
Published 02/01/23