चित्रकेतू वृत्रासूर बनला त्याची कथा.
Listen now
Description
ज्यांना दधीची ऋषीची कथा माहीत आहे त्यांना हेही माहीत असेलच की कशाप्रकारे असुर वृत्र कोणत्याही धातूच्या बनलेल्या अस्त्रापासून अवध्य होता आणि त्याचा संहार करण्यासाठी दधीची ऋषींनी आपल्या प्राणांचा त्याग करून आपल्या अस्थी देवराज इंद्राला दान केल्या होत्या. त्याच वृत्रासुराच्या पूर्वजन्माची ही कथा.   शूरसेन देशात चित्रकेतू नावाचा एक राजा होता. ज्याने पूर्ण पृथ्वीवर विजय प्राप्त केला. राजाची शक्ती इतकी होती की त्याच्या राज्यात राहणार्‍या सर्वांसाठीच्या खाण्याच्या वस्तू आपोआप उत्पन्न होत असत. राज्यात सुख-समृद्धी अशी होती, की प्रजा राजाला दूसरा ईश्वर मान त असे. धन-दौलत, ऐश्वर्य, चित्रकेतूला कशाचीही कमी नव्हती. आपल्या पराक्रम आणि शौर्याने त्याने अनेक सुंदर स्त्रियांचं हृदयही जिंकलं होतं. चित्रकेतूच्या एक कोटी राण्या होत्या. परंतू एवढं ऐश्वर्य असूनही तो निःसंतान होत. त्यामुळेच तो नेहमी चिंतेत असे.  एक दिवस तिन्ही लोकी भ्रमण करण्यासाठी निघलेल्या प्रजापती अंगिरा ऋषीनी चित्रकेतूच्या महाली त्याचं आतिथ्य स्वीकारलं. राजकडे सर्वकाही असूनही त्याचा उदास चेहरा पाहून ब्रह्मर्षीनी याचं कारण विचारलं, चित्रकेतू म्हणाला, "हे भगवान, समग्र सृष्टीतील सगळी सुगंधित फुलं मिळूनही एखाद्या भुकेलेल्या माणसाची भूक शमवू शकत नाहीत, त्याच प्रकारे हे सारं ऐश्वर्य मिळून एका निपुत्रिक पित्याचे दुःख दूर करू शकत नाही. भुकेलेल्याला जशी अन्नाची आवश्यकता असते त्याच प्रकारे, हे भगवान मला एक पुत्र प्रदान करून माझी ही पीडा दूर करा."   त्रिकालदर्शी अंगिरा ऋषींना हे चांगलंच ठाऊक होतं की चित्रकेतूच्या भाग्यात संतान सुख नाहीए. पण त्याच्या हट्टापुढे ब्रह्मर्षीही हतबल झाले. म्हणून एका यज्ञाचं आयोजन करून त्यातून उत्पन्न झालेलं च
More Episodes
गणेशपुराणात शौनक ऋषी सूतांना गणेशाचा गजानन कसा झाला याची कथा विचारतात. सूत मुनी त्यांना तीच कथा ऐकवतात जी नारायणाने नारद मुनींना ऐकवली होती. एकदा देवराज इंद्र पुष्पभद्रा नदीच्या शांत आणि सुंदर किनारी उभे होते. त्या निर्मनुष्य क्षेत्रात अनेक सुंदर फुले आणि झाडे लावलेली होती.
Published 02/08/23
श्रोतेहो, सूत्रधार मध्ये आज आपण स्यमंतक मण्याबद्दलची कथा ऐकूया. स्यमंतक मणि हे असं एक रत्न होतं. ज्यामध्ये स्वतः भगवान सूर्यदेव यांचं तेज समाविष्ट झालेलं होतं. हा मणी ज्या राज्यात असेल ते राज्य धनधान्याने समृद्ध असे. हा मणी आपल्याचजवळ असावा असं प्रत्येकाला वाटे.   एकदा साक्षात भगवान...
Published 02/01/23