डॅम इट आणि महेश कोठारे
Listen now
Description
प्रसिद्ध अभिनेते व चित्रपट निर्माते महेश कोठारे हे मराठी सिनेजगतातील सुपरस्टार. त्यांनी लिहिलेले `डॅम इट आणि बरंच काही...` हे आत्मचरित्र त्यांच्याच आवाजात आता `स्टोरीटेल`वर आले आहे. त्यानिमित्त पुण्यात त्यांचा विशेष गौरव झाला. त्या प्रसंगी  खुद्द महेश कोठारे, ज्येष्ठ साहित्यिक व चित्रपट निर्माते रामदास फुटाणे, सिनेपत्रकार व तारांगणचे संपादक मंदार जोशी यांच्याशी संतोष देशपांडे यांनी संवाद साधला. त्यात कोठारे यांनी या आत्मचरित्रामागची पार्श्वभूमी उलगडून दाखविली, फुटाणे यांनी कोठारे यांच्या चित्रपटसेवेतील महत्त्व अधोरेखित केले, तर मंदार जोशी यांनी या पुस्तकाच्या निर्मितीवेळच्या आठवणींना उजाळा दिला.  स्टोरीटेल वर `डॅम इट आणि बरंच काही` ऐकण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा- https://www.storytel.com/in/books/damn-it-ani-barech-kahi-2819989
More Episodes
जगातील एक आघाडीचा ऑडिओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म म्हणून ओळखले जाणारे स्टोरीटेल भारतात येऊन ७ वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने, स्टोरीटेल इंडियाचे प्रमुख योगेश दशरथ यांच्याशी संतोष देशपांडे यांनी साधलेला हा संवाद. 
Published 11/25/24
अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक डोनाल्ड ट्रम्प यांनी जिंकली. ते कसे जिंकले, आता ते काय करतील, भारताला त्याचा फायदा आहे का, अमेरिकेतील भारतीय त्याकडे कसे बघतात अशा अनेक प्रश्नांची उकल करण्यासाठी अमेरिकेतील प्रसिद्ध युट्यूबर अमेरिकन भाऊ अर्थात राहुल पाटील यांना बोलतं केलं आहे, संतोष देशपांडे आणि...
Published 11/16/24