पाऊस, आई व सारे काही / Rains, Mother and everything else/ (पाहुणा: पुरस्कार जगताप)
Listen now
Description
दुसऱ्या पर्वातील शेवटचे भाग; या वर्षातील हि शेवटची भेट. आणि या खास मुहूर्ताची समाधी साधून अभिषेक दाणी आणि प्रणव फडणीस बरोबर आहे एक नवा पाहुणा. हरहुन्नरी व्यक्तिमत्व आणि एक विनम्र माणूस, असा आपण 'पुरस्कार जगताप' ची ओळख सांगू शकतो. या भागात विनोदी गप्पा सुरु तर झाल्या आणि काळात नकळत एक भावनिक रूप या कार्यक्रमाला आलं. या भागातील कविता खालील प्रमाणे:     ग्लोबल लोकल - प्रणव फडणीस   ती आणि मी - पुरस्कार जगताप  आषाढझड - अभिषेक दाणी  ती आली, ती राहिली, ती गेली - प्रणव फडणीस  तांदूळ - अभिषेक दाणी  आई - पुरस्कार जगताप --- 'बिस्कीट, चहा आणि कविता सहा' हा एक गप्पा मिश्रीत कवितांचा प्रयोग आहे. प्रणव फडणीस आणि अभिषेक दाणी, ह्या कार्यक्रमात स्वलिखित आणि इतर कवींच्या कविता प्रस्तुत करतात आणि त्यावर चहा पीत-पीत (अनिवार्य) चर्चा करतात. संपर्क: [email protected]
More Episodes
पर्व २ भाग ४  आज जगभरात भारतीयांनी ७५वा स्वातंत्र्यदिन साजरा केला. पण देशाच्या स्वातंत्र्याचा उपभोग आपण दररोज घेतोच. तरीही आता वेळ आहे एका वेगळ्या पातळीवरच्या स्वातंत्र्याची. त्यावर काही सादर केलं आहे. त्यासोबत प्रल्हाद केशव अत्रे उर्फ आचार्य अत्रे उर्फ केशवकुमार यांना त्यांच्या जन्मतिथी निमित्त...
Published 08/15/21
पर्व २ भाग ३ : पाहुणा - सागर चांदे  १ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा झाला. त्याच महाराष्ट्र देशाला आणि मराठी भाषेला नमन करून हा भाग सुरु झाला. गप्पा आणि कवितां मार्फत या कार्यक्रमाचा प्रवाह पोहोचला तो गुरु ठाकूर च्या 'असे जगावे' या कवितेवर. तत्पश्चात गप्पाने आयुष्य आणि जगणे या विषयावर थोडे मुक्काम...
Published 05/23/21