Episodes
दुसऱ्या पर्वातील शेवटचे भाग; या वर्षातील हि शेवटची भेट. आणि या खास मुहूर्ताची समाधी साधून अभिषेक दाणी आणि प्रणव फडणीस बरोबर आहे एक नवा पाहुणा. हरहुन्नरी व्यक्तिमत्व आणि एक विनम्र माणूस, असा आपण 'पुरस्कार जगताप' ची ओळख सांगू शकतो. या भागात विनोदी गप्पा सुरु तर झाल्या आणि काळात नकळत एक भावनिक रूप या कार्यक्रमाला आलं. या भागातील कविता खालील प्रमाणे:     ग्लोबल लोकल - प्रणव फडणीस   ती आणि मी - पुरस्कार जगताप  आषाढझड - अभिषेक दाणी  ती आली, ती राहिली, ती गेली - प्रणव फडणीस  तांदूळ - अभिषेक...
Published 11/29/21
पर्व २ भाग ४  आज जगभरात भारतीयांनी ७५वा स्वातंत्र्यदिन साजरा केला. पण देशाच्या स्वातंत्र्याचा उपभोग आपण दररोज घेतोच. तरीही आता वेळ आहे एका वेगळ्या पातळीवरच्या स्वातंत्र्याची. त्यावर काही सादर केलं आहे. त्यासोबत प्रल्हाद केशव अत्रे उर्फ आचार्य अत्रे उर्फ केशवकुमार यांना त्यांच्या जन्मतिथी निमित्त स्मरून त्यावर काही गप्पा झाल्या आहेत. आणि ऑगस्ट मध्ये आषाढ श्रावणावर नाही बोलून कसं चालणार? अशा काही विषयांवर दिलखुलास गप्पा आणि कवितेची मैफिल रंगली.  या भागातील कविता खालील प्रमाणे:   स्वागत आणि...
Published 08/15/21
पर्व २ भाग ३ : पाहुणा - सागर चांदे  १ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा झाला. त्याच महाराष्ट्र देशाला आणि मराठी भाषेला नमन करून हा भाग सुरु झाला. गप्पा आणि कवितां मार्फत या कार्यक्रमाचा प्रवाह पोहोचला तो गुरु ठाकूर च्या 'असे जगावे' या कवितेवर. तत्पश्चात गप्पाने आयुष्य आणि जगणे या विषयावर थोडे मुक्काम मांडला आणि कार्यक्रमाचा शेवट गणपती बाप्पांच्या आठवणीने झाला. या भागातील कविता खालील प्रमाणे:   स्वागत आणि परिचय   महाराष्ट्र कोणाचा? - अभिषेक दाणी   व्यक्तिपूजा - प्रणव फडणीस   असे जगावे -...
Published 05/23/21
पर्व २ भाग २: पाहुण्या - नीना जठार  गेल्या महिन्याभरात बरेच महत्वाचे दिवस होऊन गेले. त्यातले ह्या उपक्रमासाठी उपयुक्त म्हणजे मराठी राजभाषा दिवस, कवी वि.वा.शिरवाडकर ह्यांचा जन्मदिन, पुण्यतिथी आणि तशीच कवी सुरेश भट ह्यांची पुण्यतिथी आणि राट्रीय महिला दिवस. त्यात आणि कवी कृ.ब.निकुंब ह्यांचे जन्मशताब्दी वर्षीही साजरे होत आहे. ह्याच दिवसांचा आशय घेऊन, आजचा हा भाग गप्पा आणि कवितांमध्ये रंगला. ह्या भागात सौ. नीना जठार कार्यक्रमाला पाहुण्या म्हणून लाभल्या. ह्या भागातील कविता खालील प्रमाणे:   ...
Published 03/14/21
माणूस एक समाजप्रेमी प्राणी आहे. समाज आला म्हणजे नाती आलीच. प्रत्येक नातं म्हणजे भावनांची आणि अनुभवांची नवीन पेटीचा असते. प्रत्येक नात्यात आपली पेटी थोडी रिकामी करतो आणि थोडी नव्याने भरून घेतो. नात्यांवर बोलता बोलता आजचा भाग पृथ्वीच्या प्रेमापासून मैत्रीच्या नसलेल्या नियमांपर्यंत गेला. ह्या भागात मंगेश केळकरशी गप्पा मारत आहेत अभिषेक दाणी आणि प्रणव फडणीस. ह्या भागातील कविता खालील प्रमाणे: एक अजब लव्हस्टोरी - प्रणव फडणीस वर्गातील रामायण - अभिषेक दाणी कॉलेज कट्टा - मंगेश केळकर इंटरनेट -...
Published 01/31/21
मन हा विषय कवी, लेखक आणि विचारवंतांच्या चिरंतन सोबतीचा आहे. वय, सामाजिक परिस्तिथी आणि वैयक्तिक परिस्तिथी ह्यांचा मनावर काय परिणाम होतो? त्या घुसमटीतून त्याला कसं वाचवावं? अश्या काही गोष्टींवर चर्चा करायला ह्या भागात प्रथमच पाहुण्या म्हणून लाभल्या आहेत सौ. माधुरी खेडकर. त्यांच्याशी गप्पा मारत आहेत प्रणव फडणीस आणि अभिषेक दाणी. ह्या भागातील कविता खालीलप्रमाणे: मी फॉर्म भरतो - प्रणव फडणीस   थंड राहायचं - अभिषेक दाणी   घुसमट - माधुरी खेडकर   दोन घरं - अभिषेक दाणी   वाढदिवस - प्रणव फडणीस   ...
Published 12/13/20
पु.ल.देशपांडे ह्यांची १०१वी जयंती ह्या दिनी साजरी झाली. त्यासोबतच प्रसिद्ध कवी आणि गीतकार ग.दि.माडगूळकर ह्यांच्याही जयंती ला १०१ वर्षे पूर्ण झाली. अश्या प्रसंगावर त्यांच्या मैत्रीचे किस्से आणि कविता सादर झाल्या. त्याच सोबत समाजात चालू घडामोडींच्या विषयावर गप्पा गोष्टी झाल्या ज्यात अजूनही चर्चेत असलेला कोरोना, सिने श्रुष्टीतल्या घडामोडी आणि दारावर उभी ठाकलेली दिवाळी ह्यांचा समावेश होता. ह्या भागातील कविता खालील प्रमाणे: करोना म्हणतो - प्रणव फडणीस दाढी - अभिषेक दाणी पु.ल. देशपांडे (एक...
Published 11/08/20
भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणजे त्यावर कविता होणं आलंच. मराठी माणूस म्हंटलं कि डोक्यात 'जयोस्तुते' चा नाद घुमणं आलंच. पण स्वातंत्र्य नंतर भारत कुठे आहे? ह्या युद्धाने आपल्याला काय दिलं? युद्ध वरून आठवते ते ह्या भारतभूमीकर लढलं गेलेलं एक पौराणिक युद्ध - महाभारत. ह्या अशा विषयांवर गप्पा आणि कविता ह्या भागात प्रस्तुत झाल्या. आणि हो, ह्या दिवशी ४५ वर्षांपूर्वी, शोले चित्रपट प्रथम प्रेक्षकांपुढे आला. ह्या भागात प्रस्तुत झालेल्या कविता खालीलप्रमाणे: जयोस्तुते - वि.दा.सावरकर (प्रस्तुतीकरण: अभिषेक...
Published 08/15/20
माणसाच्या जगण्यावर बऱ्याच गोष्टींचा परिणाम होत असतो. त्यात महत्वाचं म्हणजे त्याचं मन, विचार आणि भोवतालीचं विश्व ज्यात येतो समाज, राजनीति आणि नक्कीच प्रसार वाहिनी. अश्याच विषयावर गप्पा आणि काही कविता प्रस्तुत करतात अभिषेक दाणी आणि प्रणव फडणीस. ह्या भागातील कविता आहेत  खरं सांगू का मित्रो - प्रणव फडणीस घुसगावचे उंदीर - मंगेश पाडगावकर (प्रस्तुतकर्ता: अभिषेक दाणी) कुस्ती - अभिषेक दाणी  शह आणि मात - प्रणव फडणीस बातमी - अभिषेक दाणी डेली सोप - प्रणव फडणीस
Published 06/21/20
'बिस्कीट, चहा आणि कविता सहा' च्या पहिल्या वहिल्या भागात स्वरचित आणि प्रसिद्ध कविता सादर झाल्या. चहा बरोबर आज विषय झाला कोरोना, त्यातून उद्भवलेली परिस्तिथी आणि त्यात कधी ना हार. ह्या भागातील कविता आहेत: चहा - प्रणव फडणीस महामारी - अभिषेक दाणी कोरोना बनानेवाले - प्रणव फडणीस कणा - वि.वा.शिरवाडकर (प्रस्तुतकर्ता: अभिषेक दाणी) टेकडी - अभिषेक दाणी  वर्चुअल मल्टिप्लेक्स - प्रणव फडणीस
Published 05/24/20