Episodes
खांडवप्रस्थ वनात लागलेली आग अग्निदेवांच्या सहाय्याने श्रीकृष्ण आणि अर्जुनाने विझवली. या प्रचंड आगीत आपला जीव वाचल्यामुळे मयासूर राक्षसाने पांडवांना त्यांच्या इंद्रप्रस्थ  नगरीत त्यांची राजधानी बांधण्यासाठी तसेच राजमहाल बांधण्यासाठी मदत केली. मयासूर हा रावणाचा सासरा तर होताच पण त्याचबरोबर तो एक निपूण वास्तु शिल्पकारदेखील होता. सर्व देवदेवता, गंधर्व, राजे आणि ऋषिमुनी हा आलिशान राजमहाल पहायला आले. स्वत: युधिष्ठिराने या सर्वांचे यथोचित आदरातिथ्य केले. त्याचवेळी देवर्षी नारदमुनींच्या उपस्थितीत...
Published 08/24/22
श्रीकृष्णाच्या हातून झालेल्या कंसाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी क्रोधाने आंधळा झालेल्या जरसंधाने मथुरेवर हल्ला करायचे ठरवले.  जरसंधाने आपल्या सेनेसह मधुरेला घेरले आणि श्रीकृष्ण-बालरम दोघांना युद्धाचे आव्हान दिले. मथुरावासीयांनी श्रीकृष्ण आणि बालरम दोघांचा पराक्रम या पूर्वीही पाहिला होता त्यामुळे ते निश्चिंत होते.  श्रीकृष्ण आणि बलराम दोघांनी आपल्या यादव सेनेला जरसंधाच्या सेनेसमोर आणून उभे केले. मगधाच्या सेनेचे संख्याबळ जास्त असले तरी तिच्याकडे कृष्णबलरामाच्या सेने सारखे युद्ध कौशल्य...
Published 08/17/22
जरासंध मगध देशाचा राज्यकर्ता होता आणि श्रीकृष्णाच्या जीवनाशी त्याचा घनिष्ठ संबंध होता. या कथेत आपण जरासंधाविषयी आणि श्रीकृष्णाशी असलेल्या त्याच्या नात्याविषयी जाणून घेणार आहोत  मगधेवर जेव्हा राजा बृहद्रथ राज्य करत होता तेव्हा त्याची प्रजा खूप खुश होती. बृहद्रथाचा विवाह काशीच्या जुळ्या राजकुमारींशी झाला आणि तो एका आनंदी गृहस्थ जीवनात बांधला गेला... जस जसा काळ पुढे सरकत होता तशी राजाच्या मनात पुत्र प्राप्तीची इच्छा वाढू लागली.  अखेर बृहद्रथने निर्णय घेतला आणि त्याने आपल्या दोन्ही पत्नींना...
Published 08/10/22
सत्ययुगात तारक (तारक) नावाचा एक असुर होता, त्याने 100 वर्षे अत्यंत कठोर तपश्चर्या केली होती. दर 100 वर्षांनी तो आपली तपश्चर्या अधिक कठीण बनवत नेई. पहिली 100 वर्षे तो पाण्यावर जगला आणि नंतर तो फक्त हवेत जगला. त्याच्या तपश्चर्येने प्रभावित होऊन, भगवान ब्रह्मदेव तारकासुराला (तारकासुर) वर देण्यासाठी त्यांच्यासमोर प्रकट झाले. आणि म्हणाले, "मी तुझी भक्ती आणि तपश्चर्या पाहून प्रसन्न झालो आहे, तुला कोणते वरदान हवे आहे? मला सांग आणि ते तुला दिले जाईल"   
Published 08/03/22
पांडवांच्या महाप्रयाणानंतर अर्जुनाचा नातू आणि अभिमन्यूचा मुलगा परिक्षीत हस्तीनापुरचा राजा बनला. प्रत्यक्षात पांडव भावांकडून विद्या प्राप्त केलेले परिक्षीत सर्वगुण संपन्न महाप्रतापी राजा होते. परिक्षीत गुरू कृपाचार्य आणि युयुत्सू दोघांच्या निगराणी खाली उत्तम प्रकारे राजधर्माचे पालन करत होते. परिक्षीतांचा विवाह उत्तर राजाची कन्या इरावती सोबत झाला. आणि त्यांना जनमेजय, भीमसेन, श्रुतसेन आणि उग्रसेन नावाचे चार पुत्र झाले.   
Published 07/27/22
इला आणि बुध यांच्या पोटी जो पुत्र जन्माला आला त्याचं नाव पुरुरवा होतं. पुरुरावा ने आपले पिता चंद्र यांच्या नावे चंद्र वंशाची स्थापना केली. आणि इलाच्या पश्चात ते राजा बनले. पुरूरव्यामध्ये देवसुलभ गुण होते आणि ते प्रचंड बलशाली आणि प्रतापी राजा होते. पुरुरवानी शंभर अश्वमेध यज्ञ करून स्वतःला देवांप्रमाणे यशोबल धारी बनवले होते. तिन्ही लोकांत पुरूरावाच्या शौर्यगाथा गायल्या जाऊ लागल्या. त्यामुळे प्रभावित होऊन देवांचा राजा इंद्रानेही पूरुरवा बरोबर मैत्री केली आणि असुरांविरुद्धच्या लढाईत अनेकवेळा...
Published 07/20/22
वैवस्वत मनु आणि महाराणी श्रद्धा यांना बरीच वर्ष संतती नव्हती. म्हणून पुत्रप्राप्तीसाठी त्यांनी महर्षि वसिष्ठांच्या उपदेशानुसार, भगवान मित्र आणि वरुण यांची उपासना करण्याचा निर्णय घेतला. वसिष्ठ ऋषींच्या पाठबळामुळे मनूने पुत्रेष्टि यज्ञ करण्याचं ठरवलं. त्याने भगवान मित्र आणि वरुण यांच्याकडे आपल्या वंश पुढे चालावा म्हणून पुत्रप्राप्तीची इच्छा व्यक्त केली होती, परंतु विधिलिखित काही वेगळंच होतं. 
Published 07/13/22
प्राचीन काळी पृथ्वी लोकात प्रभंजन नावाचा एक बलाढ्य राजा होऊन गेला. एकदा तो जंगलात शिकारीसाठी गेला होता. तेव्हा जंगलात फिरत असताना अचानक त्याची दृष्टी एका झुडुपामागच्या हरिणीवर पडली. तिला पाहताच राजानं तिला बाण मारला. बाण लागल्यानं जखमी झालेल्या हरिणीने जेव्हा हातात धनुष्यबाण घेतलेल्या राजा प्रभंजनला पाहिले तेव्हा ती म्हणाली, “अरे मूर्ख राजा, तू हे काय केलंस? इथे मी खाली वाकून निर्भिडपणे माझ्या पाडसाला दूध पाजत होते आणि अशा अवस्थेत असताना माझ्या निरपराध जिवाला तू आपल्या बाणाने लक्ष्य केलंस....
Published 07/06/22
श्रीकृष्ण, बलराम आणि सुभद्रा यांच्या मूर्तींची निर्मिती आणि मंदिराचंबांधकाम पूर्ण झालं. आता फक्त त्यांची प्रतिष्ठापना करायची राहिली होती. पणयातही अडथळा निर्माण झाला, ज्या भगवान जगन्नाथांची मूर्ती जी कोणत्याहीमनुष्याला निर्माण करणं अशक्य होतं, तिची प्रतिष्ठापना सामान्य ब्राह्मण कसाकरू शकेल? यासाठी कदाचित देवर्षी नारद किंवा देवगुरू बृहस्पती यांच्यासारख्यादैवी ऋषींची आवश्यकता होती.राजा इंद्रद्युम्न तपश्चर्येला बसला. थोड्या वेळाने, जेव्हा कोणीतरी हाकमारली तेव्हा राजाने ध्यान सोडलं. त्याच्यासमोर...
Published 06/29/22
नीलकंदरहून परत आल्यावर बरेच दिवस झाले होते. सबर नगरीत विश्वावसू आणि अवंती नगरीत राजा इंद्रद्युम्न पुन्हा त्यांच्या आराध्य दैवताचं दर्शन घेण्यासाठी आतुर झाले होते. एका रात्री भगवान नीलमाधव इंद्रद्युम्नाच्या स्वप्नात आले. प्रथमच आपल्या परमेश्वराची निळी मूर्ती आणि अलौकिक तेज पाहून राजासुद्धा भक्तीभावाने न्हाऊन निघाला. नीलमाधव यांनी आता राजाला योग्य वेळ आल्याची सूचना दिली. ते म्हणाले, “माझ्या श्रेष्ठ भक्त इंद्रद्युम्ना, तू परत उत्कलच्या राज्यात जा. तेथे समुद्राच्या किनाऱ्यावर पाण्यामध्ये तरंगणारा...
Published 06/22/22
द्वापार  युग संपलं  आणि  कलियुगाला सुरुवात होऊन काही वर्षं झाली होती. निषाद राजा विश्ववसू याचा जन्म सबर कुळात झाला. तो उत्कल राज्यात एका आदिवासी कबिल्याचा सरदार होता. एके दिवशी जंगलात शिकार करायला निघालेला विश्ववसू रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही म्हणून त्याची पत्नी, मुलगी आणि समुहातील इतर सदस्य काही अनुचित गोष्टींच्या भीतीने थरथर कापू लागले. बरेच दिवस आदिवासी सैनिकांनी विश्ववसूच्या शोधात रात्रीचा दिवस केला, पण त्यांना त्यांच्या राजाचा ठावठिकाणा कुठेही सापडला नाही. त्यामुळे थकून भागून...
Published 06/15/22
पहिला भाग : श्रीकृष्णाचे वैकुंठ गमन द्वापार युगाचा अंत जवळ येऊन ठेपला होता. ‘महाभारत’ युद्ध होऊन छत्तीस वर्ष झाली होती. गांधारीच्या शापानुसार, सात्यकी आणि कृतवर्मांच्या युद्धाने सुरू झालेल्या मतभेदाने आता संपूर्ण यादव वंश संपवला होता. बलराम स्वगृही परतल्यानंतर भगवान श्रीकृष्ण आता पूर्णपणे एकटे पडले  होते. आता त्यांनी  उर्वरित आयुष्य जंगलात घालवण्यास सुरवात केली. एके दिवशी वनवासी जारा शिकारीच्या शोधात जंगलात फिरत होता. जाराला झुडूपांमध्ये एक हरिण  असल्याचं लक्षात आलं, त्याने धनुष्य व्यवस्थित...
Published 06/08/22
मांधाता हा यूवनश्विन नावानेही ओळखला जातो. याचा अर्थ आ हे, युवनावश्वचा पुत्र जे एक महान राजा होते. ज्यांची प्रशंसा महाभारतात देखील केलेली आहे. मांधाताची जन्म कहाणी कोणत्या चमत्कारापेक्षा कमी नाही.   सूर्यवंशामध्ये युवनावश्व नावाचा एक राजा होता. त्यांचे राज्य समृध्द होते. सेना मजबूत होती. एवढंच नाही तर त्यांची प्रजाही त्यांच्यावर खूष होती. तसेच त्यांनी त्यांच्या आयुष्यात शेकडो अश्वमेध यज्ञ केले होते. एवढं ऐश्वर्य, यश असूनसुद्धा राजाला एकच चिंता सतावत होती, की राजाला पुत्र नव्हता.   
Published 06/01/22
मोरया गोसावी महाराज चौदाव्या शताब्दीतले गाणपत्य संप्रदायातील संत होते. मोरगांवी जन्मलेले गोसावी गणपतिने दिलेल्या संकेतानुसार  पुण्याजवळ चिंचवड या गावी जाऊन स्थायिक झाले. चिंचवड़ मधे त्यांनी भव्य गणेश मंदिराची निर्मिती केली आणि तिथेच त्यांनी समाधि घेतली. सूत्रधार ची ही प्रस्तुति गणेशभक्त मोरया गोसावींना समर्पित आहे.
Published 05/30/22
Published 05/27/22