Episodes
सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षण व त्यामुळे खोळंबलेल्या निवडणुकांचा मार्ग मोकळा केला. मात्र, त्यासाठी आधार असलेल्या बांठीया आयोगाच्या अहवालावर प्रश्न उभे राहणं थांबलेलं नाहीये. यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Published 07/21/22
बऱ्याच राजकारणानंतर आणि अनेक वर्षांच्या मागणीनंतर आता औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजी नगर होत आहे. त्या पार्श्वभूमीवर नामांतर, त्या मागच्या अस्मितेचा विचार आणि राजकारण यावर आहे आजचा #लक्ष असतं माझं
Published 07/19/22
भाजपच्या द्रौपदी मुर्मू आणि भजपेतर पक्षांचे यशवंत सिन्हा हे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे प्रमुख उमेदवार असणार आहेत. मात्र, केवळ भाजपच्या संख्यांबळामुळेच नव्हे, तर मुर्मू या त्यांच्या आदिवासी पार्श्वभूमी व कर्तबगारीनेही उजव्या आहेत. दुसरीकडे, सिन्हा मात्र मुर्मू यांनाच उपदेश करतायत. यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Published 07/16/22
आज गुरु पौर्णिमेनिमित्त एक संवाद, अभिवादन माझ्या आयुष्यातील ट्रोल मंडळींना! #लक्ष असतं माझं
Published 07/14/22
नुकतंच नव्या संसदेच्या आवारातील चार सिंहाच्या राष्ट्रीय बोधचिन्हाचं अनावरण करण्यात आलं. त्यातील सिंह नेहमीपेक्षा उग्र दिसत असल्याचा मुद्दा मांडला जातोय. यापूर्वीही देवतांच्या अशा उग्र रुपमागील अर्थाबद्दल चर्चा झाली होती. यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Published 07/13/22
श्रीलंकेत सध्या यादवीसारखं वातावरण आहे. ही परिस्थिती या निसर्गरम्य देशावर का आली? यातून आपण काय शिकावं? यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Published 07/12/22
किरीट सोमय्यांनी उद्धव यांना 'माफिया CM' म्हटल्यावरून शिंदे गटातील आमदार भाजपला इशारे वगैरे देऊ लागलेत. हा काय प्रकार आहे? यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Published 07/09/22
महाराष्ट्रातळ्या महा राजकीय घडामोडीनंतर एकीकडे आदित्य हे 'निष्ठा' यात्रा काढतायत, तर दुसरीकडे मनसेचे युवा नेता अमित ठाकरेही दौरे आखतायत. या दोन तरुण चुलत ठाकरे बंधुना काही फुकटचे सल्ले, यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Published 07/08/22
एका माहितीपटाच्या पोस्टरमध्ये देवी काली हिचे विपर्यस्त चित्रण दाखवल्यानं जगभरातून हिंदूंच्या तिखट प्रतिक्रिया येतायत. यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Published 07/07/22
अखेर महाराष्ट्रातल्या सत्तांतर नाट्याचा शेवटचा अंक संपत आलाय. मात्र, इतकी सारी पात्र असलेल्या या महानाट्यात राज ठाकरेंचं काय होणार, याचा कुणीच विचार केला नाही! यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Published 07/06/22
काल फडणवीस मुख्यमंत्री नाहीत हे कळल्यावर महाराष्ट्र भाजपमध्ये वेगळंच वातावरण त्यात झालं. अनेक अर्थ यामागे लावले जातायत. त्यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Published 07/02/22
गेल्या 10 दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय नाट्याची सांगता आज धक्कादायक क्लायमॅक्सने झाली. फडणवीसांऐवजी एकनाथ शिंदे यांचं नाव मुख्यमंत्री म्हणून स्वतः फडणवीसांनीच जाहीर केलं. यामागचं राजकारण खूप खोल आहे. यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Published 07/01/22
पंतप्रधान मोदींनी नुकतीच 'अग्निपथ' योजनेची घोषणा केली. सैन्यात अल्प मुदतीच्या नोकरीची ही संधी आहे. मात्र, बिहारमध्ये या योजनेला विरोध झाला. सोशल मीडियावर टीकाही होऊ लागली. यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Published 06/15/22
आज मुंबईत राजभवनातील क्रांतिकारक दालनाचा लोकार्पण सोहळा झाला. मात्र, सोहळा चर्चेत आलंय तो भलत्याच करणाने. राज्यपालांनी काहीही संबंध नसताना औरंगाबाद पाणी प्रश्नाचा उल्लेख करून, त्यावर 'मोदी है तो मुमकिन है' असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अप्रत्यक्ष अपमान केला. हे वागणं योग्य आहे का? यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Published 06/15/22
नुकतंच अमृता फडणवीस यांनी देहविक्रय करणाऱ्या महिलांना प्रतिष्ठा मिळायला हवी, अशा आशयाचं विधान केलं. त्यावरून बराच गदारोळ झाला. त्यांच्यावर टीकाही झाली. पण, काय चुकीचं बोलल्या त्या? यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Published 06/14/22
भाजपतून काढलेल्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्माच्या प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्यावर चिडलेल्या मुस्लिम समाजाचा राग आज देशभर दिसून आला. मात्र, एका व्यक्तीच्या निषेधासाठी इतका उद्रेक योग्य आहे? यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Published 06/12/22
प्रेषित मुहंमद यांच्याबद्दल आक्षेपार्ह बोलल्याबद्दल आणि अशाच वागणुकीसाठी भाजपच्या दोन प्रवक्त्यांवर त्यांच्या पक्षाने कारवाई केली. मात्र, यानंतर मध्य आशियातील मुस्लिम देशात आता भारत विरोध सुरु झालाय. यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Published 06/07/22
तरुण आवाजाचा दिलखुलास गायक केकेचा काल अचानक मृत्यू झाला. त्याच्या आठवणी तर सगळेच जागवतायत. मात्र, त्याच्या या अकाली मृत्यूने शिकवलेला धडा कळलाय का तुम्हाला? यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Published 06/02/22
मोदी सरकारला 8 वर्ष पूर्ण होतायत. नुकतेच मोदी म्हणाले की तयाच्या सरकारने देशवासियांची मन खाली जाईल, असं एकही काम केलं नाही. खरंच असं आहे का? यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Published 05/31/22
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी obc आरक्षणावरून सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली. त्यावेळी, "जमत नसेल तर घरी जा, स्वयंपाक करा"असं पाटील म्हणाले. त्यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Published 05/27/22
शरद पवारांनी ही मागणी केल्याने चर्चा सुरु झालीये. यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Published 05/26/22
हार्दिक पटेल सोडा, खुद्द पृथ्वीराज चव्हाण म्हणतायत की चिंतन शिबिरात चिंतन झालं नाही. यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Published 05/25/22
राज यांचं अयोध्या दौरा स्थगित झाल्याने वेगवेगळे अर्थ काढले जातायत. त्यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Published 05/20/22
दिग्दर्शक अभिजीत पानसे यांची 'रान बजार' ही वेबसिरीज येतेय. त्यातील एका टीजरमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळीचे बोल्ड सीन्स आहेत. मात्र, यावरून आता तिला ट्रोल केलं जातंय. पण, ज्या महाराष्ट्रात 'सखाराम बाईंडर'सारख्या नाटकांपासून ते अनेक चित्रपटांत बोल्ड सीन आले, तिथं हा गहजब कशाला? यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं
Published 05/20/22
काँग्रेसच्या नुकत्याच झालेल्या संकल्प शिबिरात राहुल यांनी प्रादेशिक पक्षांवर टीका केली. प्रादेशिक पक्षांना विचारसरणी नसते, असा दावा त्यांनी केला. मात्र, राहुल यांचं हे मत वस्तुस्थिती आहे की अहंकार? यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Published 05/17/22