Episodes
ते पुन्हा हसत म्हणाले, 'डॉक्टर पोरगं तुमचं असो, माझं असो किंवा आणखी कोणाचं असो, पोराच्या शिक्षणावर झालेला खर्च मी खर्च समजतच नाही, हा खर्च हा भविष्यामध्ये भरभक्कम परतावा देणारी गुंतवणूक असते‘‘गोरगरिबांची पोरं शिकतील तोच माझा परतावा... मंग खर्च झालाच कुठे ? मी भारावून म्हणालो ‘या अनाथ मुलांसाठी तुम्ही किती करत आहात... ?‘
Published 06/25/24
Published 06/25/24
मेक्सिको मधल्या Cancun बीच वर रात्री फिरताना अगदी अजब, गोष्ट अनपेक्षितपणे पाहायला मिळाली.समुद्रातून बाहेर पडून बीचवर मोठं खड्डा करून अंडी घालणाऱ्या कासविणीशी आमची गाठ कशी पडली त्याची ही मजेदार चर्चा!
Published 06/24/24
"खेड्यातल्या वडाखाली पोरं सूरपारंब्या खेळताना दिसली की, माझ्या आयुष्यातल्या राहून गेलेल्या गोष्टींची मनाला फार चुटपुट वाटते .आता गळाही गेला आणि पायातली हिंडायची, पोरांबरोबर नाचायची शक्तीही." पु. ल. देशपांडे.
Published 06/23/24
काही काळापूर्वी, काही शास्त्रज्ञांना आश्चर्य वाटले की मधमाश्या हे षटकोनी पोळं नेमके कसे तयार करतात? तर, त्यांना आढळलं की काही मधमाश्या त्यांच्या शरीराचा एक साधन म्हणून वापर करून मेणामध्ये वर्तुळं तयार करायला सुरवात करतात. असं का घडतं हे शास्त्रज्ञांना खरोखर माहित नाही, परंतु मधमाश्या त्यांच्या शरीरातील उष्णता वापरून वर्तुळाच्या आकाराचं मेण वितळवतात आणि षटकोनी आकार बनवतात असं दिसलं.षटकोनी मधाच्या पोळ्यातले आकार पूल, विमान आणि कार यांसारख्या मानव वापरत असलेल्या गोष्टी बांधण्यासाठी सुध्दा उपयुक्...
Published 06/19/24
"You Indian women always have a shoulder to lean on." असे म्हणून माझ्या गाडीचे टायर बदलून देणारी टीना ही माझ्या मनातल्या अमेरिकन स्त्री च्या चित्रांपेक्षा वेगळी होती. चेहेरा रंगवून , उंच टाचांच्या चपला घालून स्वातंत्र्य उपभोगणाऱ्या स्त्री पेक्षा हे वास्तव निराळे होते.
Published 06/15/24
लेखक म्हणतो प्रत्येकाने एक जाणून घेतले पाहिजे कि, जर मी आज रात्री झोपलो आणि उद्या उठलो नाही, तर माझ्यामध्ये जी काही सर्जनशीलता आहे ती मी रिकामी केली आहे का? कमीत कमी पश्चात्ताप तेव्हाच होईल जेव्हा किती लक्ष, वेळ आणि शक्ती खर्च केली आहे हे ध्यानात येईल आणि हे योगायोगाने घडत नाही; हे जाणीवपूर्वक आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांनी घडते.
Published 06/13/24
तुम्हाला माहित आहे का की मध हा पदार्थ जगातील काही खाद्यपदार्थांपैकी एक आहे जो मानवी जीवन टिकवू शकतो? एक चमचा मध २४ तासांसाठी पुरेसा असतो. मधमाशांनी तयार केलेले प्रोपोलिस हे सर्वात शक्तिशाली नैसर्गिक प्रतिजैविकांपैकी एक आहे. मधाची कालबाह्यता तारीख नसते. पूर्वी महान सम्राटांचे मृतदेह सोन्याच्या शवपेटीमध्ये पुरले गेले आणि त्यांचा क्षय टाळण्यासाठी ते मधाने लेपित केले गेले.
Published 06/12/24
लग्न पार पडले. जोड्याने पुन्हा पाया पडायला आला, तेव्हा नवपरिणीत पत्नीला म्हणाला, “हया नसत्या, तर आज जसा मी आहे तसा कधीच घडलो नसतो !”त्यावर पाटिल बाई उत्तरल्या,'शैलेश जर माझ्या वर्गात नसता, तर मला कधीही कळलं नसतं, की शिक्षकाने आधी प्रत्येक मुलाची आई असणं जास्त जरुरीचं आहे, मग शिक्षक' !
Published 06/11/24
त्यांची टोळी ही साधी सुधी नसते. चांगले दोन अडिचशे टोळीचे सदस्य एकाचवेळी कल्ला करत घिरट्या घालत नदीकाठच्या चिखलावर तुटुन पडलेले दिसतात. चिमणीच्या आकाराच्या देखण्या भिंगरी पक्षांची सध्या घरटी बांधण्यासाठी धांदल उडाली आहे. हा पक्षी चिखलापासून आपलं घरटं बनवतो. यासाठी चिखल जमण्यासाठी समूहाने आरडून एकच कल्ला करत पाणवठ्यावर जमतो. त्याचे चिखल चोचीत जमवतानाचे दृष्य एखाद्या मोठ्या टोळीने एकत्र जमून हल्लाबोल उडवून द्यावा असं असतं.
Published 06/10/24
मला आज त्या मुलामध्ये पांडुरंग दिसला .सोन्याचे दागिने ,झगमग कपडे, हार फुलं काहीही न ल्यायलेले हेच साधे भोळे लोक साक्षात देव असतात नीट बघितले की दिसतात...
Published 06/09/24
दुसऱ्या दिवशी त्याने चौथा दिवा लावला आणि घाईघाईने उत्तरेकडे निघाला. दिवा विझला. आणि त्याला कळले की हा महाल फक्त त्याच्यासाठी आहे. "नाही, गिरणी बंद करू नकोस." म्हातारा म्हणाला, "हा राजवाडा आता तुझा आहे. पण जोपर्यंत तू गिरणी चालवत आहेस तोपर्यंतच हा राजवाडा उभा राहील. गिरणी बंद पडली तर तो कोसळेल आणि तू सुद्धा त्याखाली मरशील" . म्हातारा पुन्हा म्हणाला, "तुझ्यासारखं मीही लोभापोटी साधूचे ऐकले नाही आणि माझे संपूर्ण तारुण्य ही गिर...
Published 06/08/24
न्यूज चॅनलवाल्यांनी याचं पुन्हा एकदा फीचर केलं. त्याचा छोटासा इंटरव्ह्यू घेतला.ढसाढसा रडला म्हातारा. म्हणाला, "'मारवाडातलं गाव होतं माझं....पण एकदम कोरडं ठाक!! पाण्यासाठी चार चार किलोमीटर वणवण फिरायची आई माझी. आणि आईबरोबर मीही.एक एक थेंब प्राण कंठाशी आणायचा. पाण्यात देव दिसायचा. इथली उधळमाधळ बघितली की जीव तुटतो माझा. मला पता आहे, लोक माघारी माझी टिंगल करतात. पन धापैकी एक मानस तरी ऐकतो. माझा काम झाला की मग....!!‘
Published 06/07/24
दुसऱ्या दिवशी, शंकराचार्यांना उपवास घडला हे ऐकल्यावर त्या दाम्पत्यास अतिशय वाइट वाटले.शिष्यांनी रात्री पाकसिद्धीसाठी वन्हीच उपलब्ध नसल्याचे सांगितले. तेव्हा त्या गृहिणीने थोडे पाणी हातात घेऊन मंत्रित करून लाकडांवर शिंपडून अग्नी प्रज्वलित केला हे बघुन शंकराचार्यांना मोठेच आश्चर्य वाटले. काश्मीरच्या सामान्य जनांकडूनही खुप काही शिकण्यासारखे आहे हे शंकराचार्यांना कळून चुकले होते.
Published 06/06/24
येत नाही हे कबूल करण्या ऐवजी "ते तर मला येतय्" असा धोषा लावला की अशी फजिती होते ....!
Published 06/05/24
ही गोष्ट स्वीडनची राजकन्या आणी एका महान कलाकाराच्या प्रेमाची आहे. फार खडतर प्रवास करून त्याने स्वीडन ह्या देशात पोचण्याची आहे. शार्लटची चारूलता होण्याची आहे.
Published 06/05/24
"दिस उजाडला की हंडा घेऊन पाणी भरायला कोसभर दुर जाव लागत. घरात पोटभर खायला नाय. घाम फुटतो पण पान्हा फुटना. तुम्हीच सांगा कुठून ह्याची भूक भागू ?"औषध नक्की कुणाला देऊ ?ज्याला भूक लागलीय म्हणून तो रडतोय त्या बाळाला, की दुध येत नाही म्हणून आईला ?की परिस्थितीला ?
Published 06/03/24
सकाळी उठली तर तिला बोलताना जीभ जड झाली आहे हे जाणवले. बोलणं अस्पष्ट यायला लागलं . डॉक्टर म्हणाले,, घरी गेल्यानंतर तुम्ही मध्यम आवाजात रामरक्षा म्हणा. त्यात र शब्द अनेक वेळा आहे त्याचा परिणाम होतो .प्रत्येक शब्द म्हणताना तोंड जमेल तेवढं उघडा.. जबड्याची हालचाल जास्तीत जास्त झाली पाहिजे. विष्णू सहस्त्रनाम म्हणालात तर अजूनच उत्तम..."
Published 06/02/24
वृथा दानं समर्थस्य | म्हणजेच एखाद्या श्रीमंताच्या मुलाला वह्या पुस्तकांचे दान करणे . दान हे नेहमी सत्पात्री असावं
Published 06/01/24
"आपण एक घास कोणाला दिला तर देव कोणत्याही रुपात येऊन आपल्या ताटात दोन घास देतो"आईचा आवाज कानात घुमायला लागला. ." पुलवाचे एक छोटे पॅकेट त्या मायलेकाला दिले तर आजीबाईने ताट भरून जेवू घातले.
Published 05/31/24
वयाच्याhttps://open.spotify.com/episode/3KqGWUrhbKoEVI7rdRZR03?si=Z9AEAsRQSr27p8pIWipd9Q साठाव्या वर्षी तिचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पुर्ण करायला पुन्हा पाण्यात उतरली. दररोज आठ, दहा, बारा, चौदा तास ती पोहण्याचा सराव करत राहिली. हळू हळू ती सलग 24 तास पाण्यात पोहू लागली. ॲथलीट डायना न्याड वयाच्या 64 व्या वर्षी क्यूबा ते फ्लोरिडा हा 180 किलोमीटर चा खुला समुद्र 5 अयशस्वी प्रयत्नानंतर यशस्वीपणे पोहुन गेली. तिचा जीवन प्रवास Nyad ह्या सिनेमात चित्रबद्ध केला आहे...
Published 05/31/24
काही गाणी ही अशी असतात की ती ऐकली तरी अंगावर शहारे येतात. माणसाच्या आयुष्यात अनेक संकटं येतात, काही प्रसंग तर असे येतात की त्या मध्ये आपली अक्षरशः कसोटी लागते. पण अशा वेळी आपण ते बोलून, भांडून व्यक्त करु शकतो . नदी मात्र अनेक गोष्टी तिच्या पोटात साठलेल्या असूनही शांतपणे वाहतच असते.
Published 05/30/24
आपले शरीर असंख्य पेशींचे. प्रत्येक पेशीत आईकडून मिळालेली २३ आणि वडिलांकडून मिळालेली २३ अशी ४६ गुणसूत्रे. ती असतात केंद्रकात (nucleus). या केंद्रकातूनच पेशीतील सर्व व्यवहारांवर क्षणोक्षणी नियंत्रण ठेवले जाते. या पेशीकेंद्रकात गुणसूत्रांची वस्ती असते. पेशी विभाजनाच्या वेळीच ही गुणसूत्रे ‘एक्स’ आकाराच्या स्वरूपात दिसतात. इतरवेळी या गुणसूत्रांचे लांबलचक धागे होऊन शेवयांसारखे पेशीत विराजमान असतात. प्रत्येक गुणसूत्र डीएनएच्या लांबच लांब धाग्याने बनलेले असते. माणसाच्या एका पेशीतील डीएनएचे सर्व धागे ...
Published 05/27/24
मी सगळं वाढल्यावर त्यांना विचारलं भातावर तूप वाढायचं का? तर त्या म्हणाल्या हो आणि त्यांनी माझ्या हातात एक पितळेची वाटी दिली ज्यामध्ये दूध होतं आणि एक चमचा होता ...मला वाटलं त्यांना बहुतेक अंधारात दिसल नव्हत ..मी म्हणाले काकू हे दूध आहे तूप नाही.. त्यांनी हळू आवाजात मला सांगितलं तूप नाही..! संपले आहे ! दुधाचा एक एक चमचा भातावर वाढ म्हणजे ती मंडळी जेवायला बसतील.
Published 05/26/24
सूक्ष्मातिसूक्ष्म कणांना त्यांचे वस्तुमान कसे प्राप्त होते, हा प्रश्न हिग्ज यांना सारखा छळत होता. त्यातूनच त्यांनी तोवर ज्ञात असलेल्या मूलकणांशिवाय वेगळे असे मूलकण अस्तित्वात असले पाहिजे, असा सिद्धांत मांडला. हा मूलकण शोधण्यासाठी “लार्ज हॅड्रॉन कोलायडर”सारखा अब्जावधी डॉलरचा महाप्रयोग हजारो शास्त्रज्ञांनी काही दशके काळजीपूर्वक तयारी करून उभा केला. आणि याचे फलित म्हणून मूलकणांच्या सर्वमान्य सिद्धांतावर शिक्कामोर्तब झाले. हिग्ज यांच्या सिद्धांतातील त्या कणांचे त्यांच्या आणि सुप्रसिद्ध भारतीय भौत...
Published 05/25/24