Episodes
फ्रामजीने एक आयडिया केली. त्याने एक दिवस ते आंबे एका करंडीमध्ये व्यवस्थित पॅक केले, त्याला एक चिठ्ठी अडकवली आणि इंग्लंडला जाणाऱ्या जहाजात ती करंडी नेऊन ठेवली.ते आंबे सगळ्या जगावर राज्य करणाऱ्या व्हिक्टोरिया राणी करता होते.१८ में १८३८ साली भारतातून पहिली आंब्याची करंडी निर्यात झाली. इंग्लंडच्या राणीला देखील हे आंबे आवडले, अस म्हणतात की व्हिक्टोरिया राणीच्या एका भारतीय सल्लागारामुळे तिला आंब्याबद्दलची उत्सुकता लागली होती. त्यानंतर मात्र ती या फळाची शौकीन बनली.
Published 05/24/24
अशी प्रवाळ बेटे समुद्रातील जीवांच्या अन्नसाखळीतील महत्त्वाचा दुवा आहेत. भारतात प्रवाळाची बेटे ही कोकणात तारकर्ली, गुजरातमधे द्वारकेजवळ, तसेच लक्षद्वीप येथे व अन्यत्र फ्लोरिडा, वेस्ट इंडीज, आफ्रिकेचा दक्षिण किनारा, स्पेन आणि मालदीव येथे आढळतात असे समजते. याखेरीज भूमध्यसमुद्रातही असे प्रवाळ आढळते. जगातील काही ठिकाणच्या प्रवाळबेटांना अलीकडच्या काळात हानी पोचली आहे असे दिसून आले आहे.
Published 05/23/24
आफ्रिकेतल्या काँगो या देशातल्या इतिहासातील एका अत्यंत दुखऱ्या पानाची गोष्ट आहे ही.काँगोमधल्या लेमेरा हाॅस्पिटल मधे छिन्न विछिन्न अवस्थेतल्या बायका रुग्ण म्हणून येऊ लागल्या. उग्र अत्याचाराचे ते भेसूर भयानक रूप पाहून डॉक्टर हादरून गेले.त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून तुटपुंज्या साधनसामुग्री मधे त्या बायकांना वाचवले. बोलते केले.
Published 05/22/24
प्रभू श्रीकृष्णानी स्वत: उडुप्पीच्या महाराजांना आशीर्वाद दिला होता की तुम्ही ज्याप्रकारे भोजनाची व्यवस्था केली होती आणि असे अप्रतिम सात्विक भोजन तयार केले होते, त्याबदल्यात मी तुम्हाला आशीर्वाद देतो की तुमच्या राज्याच्या सर्व पुरुषांच्या हातात असा नैसर्गिक गुण असेल की ते सात्विक भोजन तयार करतील व ते संपूर्ण जगात सर्वोत्कृष्ट असेल, म्हणूनच आज उडुपीच्या लोकांनी जगभरात अनेक रेस्टॉरंट्स उघडली आहेत आणि त्यांच्या हातांनी बनवलेले जेवण आज जगभर प्रसिद्ध आहे.
Published 05/21/24
आणि हे काय.. नवा कोरा पण ठेवून ठेवून जुनकट झालेला ड्रेस.. आवडला म्हणून घेतला पण घट्ट होत होता. परत देऊन बदलून न आणता वजन कमी करून मग घालावा असा विचार केला.. म्हटलं, चला.. वजन कमी करण्यासाठी चांगलं कारण मिळालंय.. अजूनही तो ड्रेस काही घालता आला नाही.. पण ‘आशा अमर असते‘ असं म्हणतात ना..!!
Published 05/21/24
म्हातारीच्या मेलेल्या नातवाने परतून जरी तिचा विश्वास संपादित केला तरी बिंग फुटण्याच्या भयाने त्याने पोबारा केला.रेटून बोललेले खोटे कधी कधी खऱ्यालाही संभ्रमित करते. पण त्या असत्याला ही सत्य प्रगटण्याची कायम भीती असते.
Published 05/17/24
जुन्याकाळी एकत्र कुटुंबांमध्ये एखादा ब्रम्हचारी किंवा मुलेबाळे नसलेला विधूर काका, मामा, एखादी बालविधवा किंवा , मुलेबाळे नसलेली आत्या, मामी वगैरे.असायची. तत्कालीन एकत्र कुटुंबात त्यांचा सांभाळ व्हायचा. घरात पडेल ते काम करुन आपली उपयुक्तता पटवून देण्याची कमाल कोशिष करणार्‍या ह्या व्यक्ती. आजच्या व्यावहारिक जगात ही फुले फळे नसलेली झाडेच.
Published 05/17/24
सदर गोष्ट चैत्र महिन्याच्या स्वागतासाठी हिंदु धर्मात घरोघरी काढण्यात येणार्‍या चैत्रांगणाची आहे. तसेच पाने, फुले, फळे, देवदेवता वगैरेंची चित्रे, चिन्हे यांची अंगणात रांगोळी काढून रंगवून त्याबरोबर निसर्ग- देवतेची आराधना करून स्वागत करण्याची आहे.
Published 05/14/24
" बुढा बँकेच्या कर्जमाफी आधिकाऱ्याला म्हणाला,"आवो साहेब, म्या आधीचे 22 बी घेतले नवते आणि हे पंधरा बी घेतले न्हाईत . म्या शामराव सावकार कडून कर्ज घेतलं ह्या वर्षाला. आता तुला जमत असेल तर सावकार कडून घेतलेले कर्ज माफ करुन दे.त्याचा माणूस रोज येतो माझ्याकडे!"
Published 05/14/24
मनाला आनंद देणारं विसाव्याचं ठिकाण म्हणजे निसर्ग! याच निसर्गाने दिलेली अनोखी भेट म्हणजे बहावा!..
Published 05/12/24
एसटीत बसल्या बसल्या गावातल्या अनेक मुली डोळ्यासमोर येत होत्या.आडदांड बांध्याची निर्मी कुठे बरं गेली?तिचं लग्न झालं एवढं कळलं. 14 वर्षांची घाऱ्या डोळ्यांची, गोबऱ्या गालांची दिग्या काकांची ‘राघी‘... चांगली शिकत होती .पण एका मुलाने तिला पत्र लिहिलं आणि रातोरात काकांनी तिचे लग्न लावून दिलं.गावातल्या अशा कित्येक झाले अचानक बेपत्ता झाल्या होत्या.
Published 05/11/24
श्री सतीश कोल्ढेकर यांनी जगातील सात खंडांपैकी 6 खंडांमध्ये मॅरेथॉन धावून यश संपादन केले आहे. 22 जानेवारी 2024 मधे 72 व्या वर्षी यांनी अंटार्टिका किंवा दक्षिण ध्रुवावर धावून मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण केली.अशा बहादुराशी मारलेल्या गप्पा आपल्याशी शेयर करीत आहे. जरूर ऐका...
Published 05/10/24
मी नातवंडांना हाक मारली - 'शुभा, शार्दुल, शर्व... खाली या. मधुमालतीचा बहर बघा. तिचा वास घ्या. तिला स्पर्श करा... आनंदी व्हा. पारिजातकाचा सडा पहा... फुलं वेचा अन् त्यांचा सुगंध भरभरून अनुभवा... मी नसेन तेंव्हा .... मी या मधुमालतीत असेन, या प्रजक्तात असेन..‘आणि प्रतिभेनं एक वेगळं वळण घेतलं ... मधुमालती अन् प्राजक्त पुरते भिनले मनात.. हा अनुभव प्रत्येकानी घ्यायलाच हवा..!!
Published 05/09/24
मी या म्हाताऱ्या बाईबरोबर शाळेत जाणार नाही... आपल्या दहा वर्षांच्या मुलाचे, सार्थकचे शब्द ऐकून संध्या स्तब्ध झाली. तो काय म्हणतो ? तो आपल्या आजीला म्हातारी का म्हणतोय ? हा असा उद्धटपणा तो कुठून शिकला असेल ?संध्या विचारात पडली…
Published 05/08/24
माधवराव पेशवे व रमाबाई यांचं एकमेकाच्या विश्वासावर आधारित अतूट असं नातं होतं . माधवराव आजारी असतानाचा एक ह्रदयद्रावक काळजाला भिडणारा असा प्रसंग...
Published 05/07/24
कमी कष्टात श्रीमंत होण्यासाठी एका शहरी तरुणाने 'गाव कडच्या नसलेल्या जमिनीचा शोध 'घेण्यासाठी केलेल्या उठाठेवीची कहाणी !
Published 05/06/24
लावलेल्या झाडांची महिन्यातून दोनदा तपासणी केली जाते. रोप व्यवस्थित रुजले आहे की नाही ते पाहिले जाते. बऱ्याचदा रोप रुजत नाही, तेव्हा दुसरे रोप लावले जाते. लागवडीला वर्ष पूर्ण झालेल्या झाडाचा वाढदिवस साजरा केला जातो. झाडाचं संगोपन करणाऱ्यांचे कौतुक केले जाते. हा उपक्रम सोलापूरकरांना आवडला आहे. आता कित्येक जण आपल्या वाढदिवशी किंवा लग्नाच्या वाढदिवशी झाडं लावण्याचा संकल्प करतात व या उपक्रमात सहभागी होतात.
Published 05/05/24
मी त्याला विचारले," तु मला ओळखतोस का ?तो म्हणाला," हो तुम्ही बिल् गेट्स आहात...!मी म्हटलं, तुला आठवतंय का कि कधीकाळी तु मला न्यूजपेपर फ्री दिले होतेस...!*तो म्हणाला, "हो...दोनदा...!"मी म्हणालो, " मला त्याची किंमत अदा करायची आहे. तुला तुझ्या आयुष्यात जी गोष्ट हवी असेल ती मला सांग...!मी तुला हवी ती गोष्ट देऊ शकतो...!!!यावर तो नम्रपणे म्हणाला, " सर पण तुम्हाला असं वाटत नाही का, कि तुम्ही ती किंमत देऊ शकणार नाही...!"
Published 05/04/24
माझ्या प्रश्नाने बंड्या गांगरला ...मी परत विचारलं "इथं इतके लोक आहेत, मग माझ्याकडेच नळी का मागितली.?"बंड्या : "तुमच्याच खिशाला मला पेन दिसला म्हणून .!!!"मग मी सगळीकडे बघितलं ...बरेचसे लोक टी शर्ट वर होते. काहींना खिसे नव्हते ..तर काहींच्या खिशाला पेन नव्हते ...बंड्याचे निरीक्षण अचूक होते ...माझ्या खिशाला माझं आवडतं पेन होतं.
Published 05/03/24
आपल्या मेंदूच्या लँटरल प्री फ्रन्टल कॉरटेक्समध्ये लक्ष केंद्रित करणारे केंद्र असते, ते यामुळे सक्रिय होते. श्वासामुळे होणारी छातीची किंवा पोटाची हालचाल तुम्ही जाणत असता त्यावेळी मेंदूतील इन्सूला नावाचा भाग सक्रिय होतो आणि डिफॉल्ट मोड शांत होतो. मन काही क्षण वर्तमानात राहते त्यावेळी मेंदूतील विचार करणाऱ्या भागाला विश्रांती मिळते...!!
Published 05/02/24
जगभरात सध्या एका धमकीची चर्चा आहे. ती म्हणजे, जर्मनीत वीस हजार हत्तींचा कळप सोडून देण्याची.बोत्सवाना मध्ये 1 लाख 30 हजारांहून अधिक हत्ती झाल्याने अनेक समस्या झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या राष्ट्राध्यक्ष्यांनी शिकारी पर्यटक जर्मनीला ही धमकी दिली.
Published 05/01/24
स्वातंत्र्य हवं तर आपलं मन मुक्त हवं, हे सांगणार हे रूपक .एकदा हा आनंद गवसला की मोराच्या अस्तित्वाशिवाय नाचता येतं .स्वातंत्र्याचे अस्तित्व असे अटींच्या पलीकडे असू शकते .
Published 05/01/24
मघापासून इतके वेगवेगळे सुगंध छातीत भरुन घेणार्‍या त्याच्या, ते वाचून छातीतच चर्रर्र झालं. पुढल्या तीनच दिवसांत... म्हणजे १८ जुलै २०२० ला, त्याचे बाबा गेले होते. आणि कॅलेंडरवरच्या १८ तारखेला होतं, एक मोठ्ठं काळा टिंब... अर्थातच फुलस्टॅाप. "म्हणजे बाबा गेले त्या दिवसापासूनच, आपल्या आईचं आयुष्यही थांबलं?... तिला आता फरकच पडेनासा झालाय की, आज काय तारीख आहे?... इतकी रिकामी झालीये ती अंतरातून, ह्या कॅलेंडर्स सारखीच?"
Published 04/29/24
माझ्या चाळिसाव्या वाढदिवसाला शांत मनाने ठरवले. ‘आता या बिग मॅन एरिकने स्मॉल किड एरीकचे स्वप्न पूर्ण करायचे‘.. आणि दुस-या दिवसापासून स्टेशनवर रुजू झालो ते माझे आवडते लाल हिरवे झेंडे हातात घेतले. मी त्या क्षणाच्या आजही प्रेमात आहे.."एरीक मस्त छोट्या एरीकसारखा, निरागस हसला.. आणि मग मोठ्या माणसासारखा बीअर रिचवू लागला.. पार्टी संपली..
Published 04/28/24
हे विलक्षण दृश्य पाहून सापाचे मन आपुलकीने भरून आले. चांगली वागणूक, नम्रता आणि गोडवा या जादूने त्याला मंत्रमुग्ध केलं होतं. तो राजाला मारण्यासाठी निघाला होता, पण आता त्याचं कार्य त्याच्यासाठीच अशक्य झाले होते. शत्रूला हानी पोहोचवायला आलेल्या शत्रूशी मैत्रीपूर्ण वागणूक असलेल्या त्या धर्मनिष्ठ राजाला मी कसं मारू? या प्रश्नामुळे तो कोंडीत सापडला.
Published 04/28/24