Episodes
अखंड भारत - Stories of a Greater Indiaच्या आजच्या भागात आपण हिंदु धर्मामधील ब्रह्मा, विष्णु आणि महेश या तीन देवतांपैकी म्हणजेच त्रिमूर्तींपैकी एक, विष्णु या देवाबद्दल माहिती घेणार आहोत. विष्णू हा पृथ्वीवरील अधर्म, दुष्ट शक्तींचा नाश करण्यासाठी, पाप, जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून लोकांना मुक्त करण्यासाठी पृथ्वीवर विविध अवतार धारण करतो, असे म्हटले जाते. भागवतपुराणानुसार सत्य युग ते कलियुगापर्यंत विष्णूने २४ अवतार घेतले आहेत. त्यामधील दहा प्रमुख अवतार 'दशावतार' स्वरूपात प्रसिद्ध आहेत. तर अश्या...
Published 12/11/20
Published 12/11/20
In today's episode of Akhanda Bharat; Saniya tells us interesting stories about Vishnu, the all-pervading deity, also known as the preserver in the triad of Bramha, Vishnu and Shiva. The word Vishnu literally means “one who can fly”. Vishnu combines many lesser divine figures and local heroes, chiefly through his avatars. A complex character, Vishnu is the Preserver and guardian of men (Narayana), he protects the order of things (dharma) and, when necessary, he appears on earth in various...
Published 12/10/20
जर इंद्र वैदिक पुराणकथांचा मुख्य आधार असेल तर अग्नि म्हणजे वैदिक विधींचे मुख्य केंद्र. अग्नि हे एक ऋग्वेदिक कालापासूनचे हिंदू दैवत आहे. ही देवता आहूतीचा स्वीकार करते.त्यास दिलेल्या आहूती ह्या थेट देवांपर्यंत पोचतात कारण अग्नि हा दूत आहे. तो तरूण आहे व सदैव तरूणच राहतो कारण अग्नि हा दर दिवशी नविन प्रज्वलीत केला जातो. तर अश्या या अमर समजल्या जाणाऱ्या "अग्नि" देवाबद्दल अधिक माहिती सांगायला सानियाबरोबर आजच्या आपल्या भागात आहेत बिपीन कुलकर्णी. बिपीन गेली काही वर्ष Infosys मध्ये उच्चपदावर कार्यरत...
Published 11/19/20
If Indra is the pivot of Vedic Mythology, then Agni is the pivot of Vedic rituals. Agni is perhaps most closely associated with sacrificial fires where he is thought to carry the offerings of humans to the gods. Over time, Agni's importance as a god diminishes, due to his overindulgence in consuming too many offerings, a fact explained in the Mahabharata. In today's episode of Akhanda Bharat; Saniya tells us interesting stories about Agni, who apart from being on sculptures is also seen on...
Published 11/18/20
अखंड भारत - Stories of a Greater India'च्या आजच्या भागात आपण यशोधन जोशी यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत देवाधिदेव इंद्र देव याबद्दल. इंद्र ही हिन्दुधर्मातली एक प्रमुख देवता आहे. हिन्दू विचारधारेनुसार हा स्वर्गाचा अधिपती आहे. आजच्या भागात आपण इंद्र - या देवाबद्दल, त्याची विस्मयकारक साहसे, त्याची वैशिष्ट्ये, त्याचे शौर्य, औदार्य आणि अभिमान याबद्दल गोष्टी ऐकणार आहोत. आणि हि माहिती देणारे यशोधन जोशी यांनी IT कंपनी मध्ये नोकरी करत असतानाच Indology मध्ये MA केले. त्यांनी museology मध्ये डिप्लोमा...
Published 11/13/20
In today's episode of Akhanda Bharat; Saniya tells us fascinating stories about the multifaceted Vedic deity - Indra; A king of gods, Ruler of heaven, God of lightning, thunder, rains and river flow. She narrates tales that depict Indra’s bravery, his generosity and also his occasional arrogance.
Published 11/11/20
अखंड भारत - Stories of a Greater India'च्या आजच्या भागात आपण डॉ मंजुषा गोखले यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत स्त्री देवता या विषयावर. आपल्या सृष्टीच्या निर्मितीत स्त्री ची भूमिका किती महत्वाची आहे ज्याबद्दल आपल्याला माहीतच नाही, विश्वास नाही ना बसत, पण हे खरंय ... तर स्त्री शक्तीबद्दल, पूजा,उपासना याबद्दल नवीन दृष्टीकोन मिळेल अशी इंटरेस्टिंग माहिती सांगणाऱ्या डॉ मंजुषा गोखले मॅडम टिळक महाराष्ट्र विद्यापीठ (टीएमव्ही) पुणे, येथील लिबरल आर्ट्स विभागाच्या डीन आहेत. डॉ. गोखले मुंबईच्या सन्माननीय...
Published 11/05/20
In today's episode of Akhanda Bharat; Saniya unfolds how the human mind that is more poetic than scientific when confronted by various forces and events of nature leads to the rise of Myths. Myths deal with various aspects of the human condition like good and evil; the meaning of suffering; origin of humans; the origin of place-names, animals, cultural values, and traditions. Myths also narrate meaning of life and death; the afterlife; and the gods. Mythology is in fact a part of Folklore,...
Published 11/03/20
नमस्कार! अखंड भारताचा अखंड इतिहास घेऊन आम्ही पुन्हा आलो आहोत नवे विषय घेऊन! 'अखंड भारत - Stories of a Greater India'च्या आजच्या भागात आपण देव या विषयावर गप्पा मारणार आहोत. हो आपल्याच देवांबद्दल खूप इंटरेस्टिंग माहिती सांगायला आपल्या बरोबर आहेत गीतेश बेहेरे. आपल्याला नैसर्गिक देवतांबद्दल माहिती देणारे गीतेश खरेतर सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत, आणि त्याबरोबरच इंडॉलॉजि पण शिकलेत. तर मग ऐकायला विसरू नका 'अखंड भारत - Stories of a Greater India'. तोपर्यंत, शिकत रहा, माहिती करून घ्या कारण इतिहासाला...
Published 10/29/20
After a short break, we're back with more interesting episodes and guests. We have also made a small change to the schedule, now the English monologue would release on Wednesday's and the Marathi conversational episode would continue to release on Friday's. In today's episode of Akhanda Bharat; Saniya dives into the concept of Diety. The origin Gods, their behaviours, the philosophy behind their vehicles and how these Vedic deities with subtle changes took new names in the post-Vedic period.
Published 10/28/20
'अखंड भारत - Stories of a Greater India'च्या आजच्या भागात आपण प्राचीन महाराष्ट्राबद्दल बोलणार आहोत. बऱ्याच श्रोत्यांना महाराष्ट्राचा इतिहास जाणून घ्यायचा होता असे आम्हाला आलेल्या प्रश्नांमधून समजून आले. म्हणूनच आपल्या महाराष्ट्रात असलेल्या लेण्या ,आपली प्राचीन खाद्य संस्कृती, पोशाख आणि सणवार याविषयी सानिया आपल्याला माहिती सांगणार आहेत. तर ऐका गोष्टी प्राचीन महाराष्ट्राच्या! आणि शिकत रहा, माहिती करून घ्या कारण इतिहासाला कालमर्यादा नसते! deccantales.com
Published 05/08/20
संपूर्ण जगाला या महामारीने लॉकडाऊन केले आहे, आपल्या पॉडकास्टच्या रेकॉर्डिंग वर पण लॉकडाऊनचे सावट आले आहे. तरी सुध्दा अखंड भारत थांबणार नाही, आम्ही उलट या संधीचा फायदा घेऊन आपल्या श्रोत्यांचे काही प्रश्न घेणार आहोत. ज्यांची उत्तरे सानिया आपल्याला योग्य रीतीने समजावून सांगणार आहे. तरी आपले हि काही प्रश्न असतील तर ते आम्हाला [email protected] वर जरूर पाठवा. तर मग ऐकायला विसरू नका, अखंड भारत - Stories of a Greater India.
Published 04/30/20
'अखंड भारत - Stories of a Greater India'च्या आजच्या भागात आपण वेद, त्यांचे अर्थ, वेद कालीन लोकांची जीवनशैली याबद्दल बोलणार आहोत. कुठेही लिहून न ठेवता हे वेद काळाच्या कसोटीवर टिकून राहिले आणि आजही जप केले जातात. या वेदातील ऋचांचे आपल्या आधुनिक काळातील जीवनाशी कसे संबंध जोडता येईल हे जाणून घेण्यासाठी आपण आजच्या भागात स्वानंद उमराणीकर यांच्याशी गप्पा मारणार आहोत. स्वानंद यांनी इंडोलॉजि मध्ये M.A. केलंय. प्राचीन ग्रंथातील शिकवण्या रुपांतरित करण्यासाठी आणि त्या सध्याच्या परिस्थितीशी जोडण्यात ते...
Published 04/23/20
अखंड भारता - Stories of a Greater Indiaच्या आजच्या भागात सानिया वेदांची उत्पत्ती, संकल्पना आणि रचना याबद्दल माहिती देणार आहे. आपल्यातील बहुतेकांना थोडक्यात माहिती आहे वेद म्हणजेच ऋग्वेद,सामवेद,यजुर्वेद आणि अथर्ववेद, पण जे आपल्याला माहित नाही ते म्हणजे कर्मकांड, यज्ञआणि तत्वज्ञान या पलीकडे, वेद हे भारताच्या इतिहासाची आणि संस्कृतीची भांडार आहेत. त्यामध्ये राजे आणि जमाती, सामाजिक आणि राजकीय व्यवस्था, आणि शेतीसारख्या दैनंदिन जीवनाचे पैलू तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रक्रिया यांचा समावेश आहे.
Published 04/21/20
In today's episode of Akhanda Bharat; Saniya dives into the origin, concept and structure of Vedas. Most of us briefly know that these sacred scripts are made of four Ved's i.e. Rig, Sama, Yajur and Atharva. But what we don't know is, beyond rituals, sacrifices or yadnya and philosophy; Vedas are a repository of India’s history and culture. They consist of stories of kings and tribes, social and political systems, aspects of everyday life like pastoralism and agriculture and even processes...
Published 04/19/20
'अखंड भारत - Stories of a Greater India'च्या आजच्या भागात आपण भारताच्या पहिल्या सुनियोजित संस्कृतीबद्दल म्हणजेच सिंधू संस्कृतीबद्दल बोलणार आहोत. उत्खनन करताना त्यात मिळालेल्या गोष्टींवरून आपल्याला त्यांची संस्कृती,व्यापार,जीवनशैली यांची माहिती मिळते. आणि याविषयी डॉ. सचिन विद्याधर जोशी आपल्याला त्यांचे अनुभव सांगणार आहेत. डॉ.जोशी पुरातत्त्वज्ञ आहेत, आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या पुण्यातल्या डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट आणि रिसर्च इन्स्टिटयूट मधील आर्किओ केमिस्ट्री विभागात ते काम...
Published 04/16/20
अखंड भारत - Stories of a Greater Indiaच्या आजच्या पर्वामध्ये सानिया आपल्याला सुमारे ८००० वर्षांपूर्वी भारताच्या पहिल्या नियोजित शहरी सभ्यतेकडे म्हणजेच सिंधू घाटी सभ्यतेकडे घेऊन जाणार आहे. त्यांची शहरे, त्यांची कला, संस्कृती, त्या लोकांचा व्यवसाय आणि एकोणिसाव्या शतकाच्या सुरूवातीस त्या कशा शोधण्यात आल्या याविषयी ती आपल्याला एक संक्षिप्त माहिती देणार आहे. आणि याच विषयावर आणखी प्रकाश टाकण्यासाठी शुक्रवारी, पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ. सचिन विद्याधर जोशी येणार आहेत. जे या विषयाची सखोल माहिती देतील आणि...
Published 04/14/20
In today's episode of Akhanda Bharat, Saniya takes us on a tour almost 8,000 years back to India's first planned urban civilisation - the Indus Valley Civilisation. She gives us a brief understanding of how well planned their cities were, the art, culture, occupation of those people and how it was discovered at the beginning of the 19th century. On Friday's episode, Saniya would be joined by Archaeologist, Dr Sachin Vidyadhar Joshi, who would dive deeper into this topic and explain the real...
Published 04/12/20
'अखंड भारत - Stories of a Greater India'च्या आजच्या भागात आपल्या सोबत आहे सम्राट साळवे. सम्राट नी Zoology (B.Sc.) आणि Anthropology (M.A.) केलंय, तसेच त्याच्या संशोधनपर प्रबंधांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. आज सम्राट आपल्याला भारताच्या भौगोलिक इतिहास, सागरी व्यापार ते अगदी डायनोसॉर कसे लुप्त झाले, या आणि अश्या बऱ्याच गोष्टींची माहिती सांगणार आहे.
Published 04/09/20
'अखंड भारत - Stories of a Greater India'च्या आजच्या भागात सानिया आपल्याला प्राचीन भारताच्या प्रवासावर घेऊन जाणार आहे.या एपिसोडमध्ये आपण भारताच्या भौगोलीक रचनेबद्दल माहिती करून घेणार आहोत . त्याचबरोबर भारताच्या भूगोलाचा त्याच्या इतिहासावर काय आणि कसा प्रभाव पडला हे पण ऐकणार आहोत.
Published 04/07/20
In today's episode of Akhanda Bharat, Saniya takes us millions of years back to an India, which today, we might not even imagine. She rebuilds an era, that existed millions of years back, when a landmass drifted towards Asia from Madagascar, when we had creatures like dinosaurs, ostriches moving freely on this land and how these natural occurrences shaped our country's climate, food, occupations & civilizations.
Published 04/05/20
'अखंड भारत - Stories of a Greater India'च्या आजच्या भागात आपल्या सोबत आहेत भारतीय पुरातज्ञ आणि संस्कृतज्ञ डॉ. श्रीनन्द बापट. प्राचीन साधनं, लेख यांचा अर्थ आणि विश्लेषण या विषयांतील तज्ञ अशी डॉ. बापट यांची ओळख आहे. ते पुण्यातील जगप्रसिद्ध भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे रजिस्ट्रार व क्युरेटर म्हणून कार्यरत आहेत. आजच्या एपिसोड मध्ये, सानिया, डॉ बापटांकडून ऐतिहासिक साधनांचा अभ्यास कसा होतो, त्या साधनांचा काळ कसा पक्का करतात, बनावट पुरावे ते कसे ओळखतात व त्यांच्या अभ्यासकाळात त्यांना आलेले...
Published 04/02/20
'अखंड भारत - Stories of a Greater India'च्या आजच्या भागात सानिया आपल्याला प्राचीन भारताच्या प्रवासावर घेऊन जाणार आहे. ती भारतात होऊन गेलेल्या, प्राचीन काळातील आपल्याला माहीत नसलेल्या राजांच्या यशोगाथा सांगणार आहे. त्यांच्या काळातील साहित्य, कलाकृती, दागिने हे एका प्रचंड मोठ्या कोड्याचे भाग आहेत आणि कसे हे सर्व इतिहासाचे भाग एकत्र केल्यावर, आपल्याला त्यांच्या आयुष्याचा उलगडा होतो.
Published 03/31/20
All of us at some point or the other have been curious about our ancestors, their life and culture. But have you ever wondered as to how you could begin this discovery? In this episode, Saniya takes us on a brief journey of ancient India. She tells us stories about dynasts who had monuments built that showcased their magnanimity, issued coins to demonstrate prosperity during their times and commissioned literature that animated their righteousness. All these put together are nothing but...
Published 03/29/20