पॉडकास्ट मधून प्रबोधन - EP 56 - Ft Dwitiya Sonavane , Shilpa Yadnopavit , Mukta Chaitanya
Listen now
Description
कुठल्याही इतर माध्यमांसारखं इंटरनेट हे दुधारी तलवारीसारखं आहे. त्याचा चांगला आणि वाईट अश्या दोन्ही प्रकारे वापर करून घेता येतो. इंटरनेट मुळे सोशल मीडिया, गेमिंग आणि इतर गोष्टींमागे वाहावत गेलेली लोकही आपण बघतो, तेच इंटरनेट चा वापर करून आपला घरगुती उद्योग वाढवायला आणि स्वतःसाठी काहीतरी नवीन शिकायला केलेला वापर हि आपण बघतो. पॉडकास्ट हे ह्या इंटरनेट मुळे आपल्याला मिळालेले एक उत्तम माध्यम आहे ह्या बाबत आता कोणाला काही शंका उरली नसेल. ट्रॅफिक मध्ये गाडी चालवताना, सकाळी वॉल्क करताना, स्वयंपाक करताना, प्रत्येक वेळेस मनोरंजनासाठी काही तरी ऐकण्या पेक्षा तो वेळ स्वतःसाठी काही तरी नवीन माहिती किंवा शिक्षण घेण्यासाठी वापरू शकतो हि संकल्पना आता हळू हळू लोकांना पटू लागली आहे. पण सगळ्याठिकाणी असतं तसंच, इथेही आहेच, मुर्गी पहेले की अंडा ? श्रोते पहिले येतील का निर्माते ? मला विचारालं तर श्रोते येतातच, चांगले निर्माते हवे. इकोसिस्टिम तयार व्हायला हवी. आम्ही मराठी पॉडकास्टर्स मिळून ह्या साठी प्रयत्न करतोच आहे. त्याचा भाग म्हणून माझ्या श्रोत्यांना इन्स्पिरेशन कट्टा सारखे ( सेल्फ हेल्प ) काही तरी नवीन माहिती / शिक्षण देणारे इतर काही पॉडकास्ट बद्दल माहिती व्हावी म्हणून आजच्या पॉडकास्ट दिनानिमित्य हा एपिसोड. मला सगळ्याच माझ्या मित्र मैत्रिणींना ह्या एपिसोड मध्ये सामील करून घ्यायला आवडलं असतं, पण ते तांत्रिक कारणांमुळे शक्य नव्हतं, त्यामुळे www.marathipodcasters.com ह्या संकेत स्थळाला नक्की भेट द्या, आणि ज्या पॉडकास्ट अँप वर तुम्ही पॉडकास्ट ऐकता तिथे पण मराठी पॉडकास्ट search करून नक्की ऎका. ह्या भागात सहभागी लोकांच्या पॉडकास्ट लिंक्स १) ग्रंथप्रेमी ( द्वितीया सोनावणे ) - https://open.spotify.com/show/0A0NHhV6vFMcFnGviiVJMV?si=b68799c70eb34766 २) सेल्फलेस पॅरेंट
More Episodes
नमस्कार, ४ मे २०२० ह्या दिवशी इन्स्पिरेशन कट्टा चा पहिला एपिसोड आला होता. गेल्या ४ वर्षात माझ्या आयुष्यात अनेक चांगले बदल घडले, आणि ह्याला निश्चित कारण म्हणजे इन्स्पिरेशन कट्टा. ह्या पॉडकास्ट मधून मला स्वतःला इतकं शिकायला मिळलं की ' जो जे वांछील' हे पुस्तक त्यातून मी लिहू शकलो. ४ मे २०२०...
Published 05/04/24
कॉर्पोरेट मध्ये काम करता आहे का ? वयाची तिशी पार केली आहे ? असं असेल तर हा एपिसोड तुमच्यासाठी आहे. कॉर्पोरेट जॉब मध्ये कंटाळा येणं, निराशा येणं, वरिष्ठांशी भांडण होणं, नको तितक्या स्पर्धेचा तिटकारा येणं असे अनेक प्रकार खूप घडतात. त्यातून पुढे चुकीचे निर्णय घेणं, नैराश्य येणं,...
Published 11/24/23