Comfort Zone च्या बाहेर येऊन काम करावं का ? EP 58 - Ft Saumitra Pote & Niranjan Medhekar
Listen now
Description
ठेविले अनंते तैसेचि राहावे.. जे आहे त्यात सुखी असं जे वागतात आहे ना आणि ज्यांना आजच्या काळात खरंच, मनापासून असं वाटतं आहे ना, त्यांना माझा सलाम. आजच्या aspirational जगात आपल्यापैकी जास्तीत जास्त लोकांना काही तरी वेगळं, चांगलं करायची इच्छा होत असते. पण जास्तीत जास्त लोकांची हि इच्छा मनात किंवा बोलण्यातच राहते, ती कृतीत उतरत नाही. ह्याचं कारण म्हणजे कृती करणं सोपं नसतं, त्या साठी आपल्या comfort zone च्या बाहेर पडावं लागतं, मेहेनत करावी लागते आणि थोडी रिस्क पण घ्यायला लागते. सौमित्र पोटे आणि निरंजन मेढेकर हे दोघे माझे सह पॉडकास्टर आणि मराठी पॉडकास्टर ग्रुपचे सदस्य आहेच त्याच बरोबर माझे मित्र पण आहेत. ह्या दोघांमधला कॉमन दुआ म्हणजे, हे दोघेही mainstream media मधले मोठे ब्रँड सोडून नवीन माध्यमांकडे वळले. कसा होता हा प्रवास, comfort zone सोडायला काय लागतं ? पॉडकास्ट आणि नवीन मीडिया माध्यमांचे फायदे अश्या अनेक विषयांवर गप्पा केल्या आहेत आजच्या ह्या भागात. सौमित्र पोटे चा मित्रम्हणे हा पॉडकास्ट सध्या खूप गाजतो आहे, तर निरंजन हा एक उत्तम कादंबरीकार बनला आहे, त्याचे पुस्तक स्टोरीटेल आणि पुस्तकं स्वरूपात उपलब्ध आहेत, त्याच बरोबर मराठी crime कथा हा त्याचा पॉडकास्ट नक्की ऐकण्यासारखा आहे. [ comfort zone, career risk, stagnation, growth, inspiration, new age media, podcasting ] #inspiration #inspirationkatta #nachiketkshire #marathipodcast #marathi #मराठी ऑडिओ लोगो क्रेडिट - Tejashrri Fulsounder - https://www.instagram.com/rjteju_/ --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/nachiket-satish-kshire/message
More Episodes
नमस्कार, ४ मे २०२० ह्या दिवशी इन्स्पिरेशन कट्टा चा पहिला एपिसोड आला होता. गेल्या ४ वर्षात माझ्या आयुष्यात अनेक चांगले बदल घडले, आणि ह्याला निश्चित कारण म्हणजे इन्स्पिरेशन कट्टा. ह्या पॉडकास्ट मधून मला स्वतःला इतकं शिकायला मिळलं की ' जो जे वांछील' हे पुस्तक त्यातून मी लिहू शकलो. ४ मे २०२०...
Published 05/04/24
कॉर्पोरेट मध्ये काम करता आहे का ? वयाची तिशी पार केली आहे ? असं असेल तर हा एपिसोड तुमच्यासाठी आहे. कॉर्पोरेट जॉब मध्ये कंटाळा येणं, निराशा येणं, वरिष्ठांशी भांडण होणं, नको तितक्या स्पर्धेचा तिटकारा येणं असे अनेक प्रकार खूप घडतात. त्यातून पुढे चुकीचे निर्णय घेणं, नैराश्य येणं,...
Published 11/24/23